ETV Bharat / city

ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरण; राज्य सरकारकडून तब्बल 13 वर्षांनी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती

गँगस्टर ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरणात तब्बल 13 वर्षांनी अ‍ॅड. प्रदीप घरात यांची विशेष सरकारी वकिल म्हणून काल नियुक्ती करण्यात आली आहे. 2002 मध्ये ख्वाजा युनूसचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला होता. या प्रकरणात अद्याप एकही सुनावणी झाली नव्हती. काल या प्रकरणात पहिली सुनावणी करण्यात आली असून पुढील सुनावणी 3 ऑगस्ट रोजी होणार आहे.

Khwaja Yunus death
ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरण
author img

By

Published : Jun 16, 2022, 9:51 AM IST

मुंबई - गँगस्टर ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरणात तब्बल 13 वर्षांनी अ‍ॅड. प्रदीप घरात यांची विशेष सरकारी वकिल म्हणून काल नियुक्ती करण्यात आली आहे. 2002 मध्ये ख्वाजा युनूसचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला होता. या प्रकरणात अद्याप एकही सुनावणी झाली नव्हती. काल या प्रकरणात पहिली सुनावणी करण्यात आली असून पुढील सुनावणी 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. राज्य सरकारने या प्रकरणात विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती न केल्याने हे प्रकरण तब्बल 13 वर्षांपासून प्रलंबित आहे.

हेही वाचा - वॉटसअॅपवर करता येणार मुंबईतील रस्त्यातील खड्ड्यांची तक्रार

घाटकोपर बॉम्बस्फोट खटल्यातील संशयित आरोपी ख्वाजा युनूस शेख 2002 मध्ये अटकेत होता. तर, 7 जानेवारी 2003 रोजी गायब झाला होता. युनूसच्या आईने याबाबत न्यायालयात याचिका केली आहे. आता राज्य सरकारकडून या प्रकरणात सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. ख्वाजा युनूस शेखचा मृत्यू संशयास्पद असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ख्वाजा युनूस शेखच्या आईने केली होती.

कोर्टाने युनूस प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यात युनूसचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. युनूसला तुरुंगात कपडे काढून पट्ट्यांनी मारहाण केल्याचे एका साक्षिदाराने कोर्टाला सांगितले होते. या प्रकरणी एकूण 14 पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवले होते. मात्र, खटला केवळ चार पोलीस अधिकाऱ्यांवर चालवण्यात आला होता. त्यात निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेसह तीन कॉन्स्टेबलचा समावेश होता. या प्रकरणात त्यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आले होते. 2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला. मात्र तपास सुरू असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. दरम्यान 2018 नंतर या प्रकरणावर कोर्टात कोणतीही सुनावणी झाली नाही.

काय आहे ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरण? - 2 डिसेंबर 2002 रोजी मुंबईतील घाटकोपर येथे बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होते. या बॉम्बस्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता, तर 39 जण जखमी झाले होते. या प्रकरणी ख्वाजा युनूसला अटक करण्यात आली होती. 27 वर्षीय ख्वाजा युनूस हा परभणीचा रहिवासी होता. तो व्यवसायाने इंजिनियर होता. दुबईत काम करत होता. त्याला पोटा ही लावण्यात आला होता. 6 जानेवारी 2003 मध्ये युनूसची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. युनूसची चौकशी करण्यासाठी त्याला औरंगाबादला नेण्यात येत होते. त्यावेळी तो फरार झाल्याचा पोलिसांनी दावा केला होता.

हेही वाचा - साईबाबांच्या दरबारात जाऊन सबकुछ माफ होत नाही - किरीट सोमैया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.