मुंबई - मुंबई महानगरपालिकेवर आपला महापौर बसवण्यासाठी भाजपने मिशन १३४ जाहीर केले आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपकडून नागरिकापर्यंत पोहचण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. Dahi Handi festival उद्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवानिमित्त भाजपाकडून मुंबईमध्ये तब्बल ३७० ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने तरुण मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे.
३७० ठिकाणी दहीहंडी मुंबई भाजपातर्फे ३७० ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून वरळी विधानसभा मतदारसंघातील जांबोरी मैदानातून मेगा दहीहंडी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. त्याचबरोबर १ हजार मंडळांच्या ५० हजार गोविंदांना १० लाखाचे विमा कवच देण्यात आले आहे. याखेरीज मुंबईतील भाजप नेत्यानी वैयक्तिक पातळीवरही मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी दिली.
१२० हून अधिक गोविंदा पथक मुंबई भाजपाकडून विविध ठिकाणी दरवर्षी दहीहंडीचे आयोजन केले जाते. मुंबईतील सण उत्सव आणि परंपरा जपण्यासाठी भाजपाच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जातात. भाजपकडून आयोजित सराव शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परवा तब्बल १२० हून अधिक गोविंदा पथक शिबिरात सहभागी झाले होते. प्रत्येकाने साधारण पाच ते सहा थर रचून सलामी दिली. प्रत्येक पथकाला बक्षिसाने गौरवण्यात आले. यंदाची दहीहंडी महापालिकेतील भ्रष्टाचारमुक्तीची असणार आहे अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.
हेही वाचा - World Photography Day 2022 जागतिक छायाचित्रण दिनाचा काय आहे इतिहास