ETV Bharat / city

करुणा शर्माची धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार - karuna sharma lodged complaint

मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप लावल्यानंतर काही दिवसानंतर रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्यावर लावलेला बलात्काराचा आरोप मागे घेतला होता.

dhananjay munde
धनंजय मुंडे
author img

By

Published : Feb 3, 2021, 6:20 PM IST

Updated : Feb 3, 2021, 6:40 PM IST

मुंबई - राष्ट्रवादीचे आमदार व मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप लावल्यानंतर काही दिवसानंतर रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्यावर लावलेला बलात्काराचा आरोप मागे घेतला होता. मात्र, यानंतर करूणा शर्मा या महिलेने पुन्हा आरोप करत धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

complaint
करुणा शर्माची धनंजय मुंडे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार

हेही वाचा - धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा वाद मध्यस्थीने मिटणार

मुलांना भेटू देत नसल्याचा आरोप

धनंजय मुंडे हे माझे पती असून माझ्या दोन्ही मुलांना त्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून स्वतःकडे डांबून ठेवले असून, मला माझ्या मुलांना भेटू देत नसल्याचा आरोप करूणा शर्मा या महिलेने केला आहे. करुणा शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 24 जानेवारी 2021 रोजी तिच्या मुलांना भेटण्यासाठी चित्रकुट या बंगल्यावर गेली असता त्याठिकाणी धनंजय मुंडे यांनी 30 ते 40 पोलिसांना बोलावून करुणा शर्माला तिच्या मुलांपासून भेटण्यास रोखले होते.

हेही वाचा - दिलासा! धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेली बलात्काराची तक्रार मागे

या तक्रारीत करुणा शर्मा हिने म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांनी तिच्या मुलांना डांबून ठेवले आहे. तिची मुलगी 14 वर्षाची असून, कुठलीही महिला केअर टेकर या ठिकाणी नाही, असं तिने म्हटलं आहे. दोन्ही मुलांच्या संदर्भात काही बरे वाईट झाले तर त्यास धनंजय मुंडे यांना जबाबदार धरण्यात यावे, असे करुणा शर्मा हिने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. येत्या 20 फेब्रुवारी रोजी करुणा शर्मा ही आजाद मैदान, मंत्रालय किंवा चित्रकूट बंगला या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार असल्याचे म्हणत त्याबद्दल तिने पोलिसांना परवानगी मागितलेली आहे.

दरम्यान, करुणा शर्मा व धनंजय मुंडे यांच्यातील वाद मुंबई उच्च न्यायालयात गेल्यानंतर यासंदर्भात मध्यस्थीने मार्ग काढून हा वाद सोडवला जाईल, असं धनंजय मुंडे व करुणा शर्मा या दोन्ही पक्षांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सांगितले होतं. तशा प्रकारचे हमीपत्रसुद्धा मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आलं होतं. मात्र, या गोष्टीला काही दिवस जात नाहीत तेव्हा पुन्हा एकदा करुणा शर्मा हिने धनंजय मुंडे यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.

Last Updated : Feb 3, 2021, 6:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.