मुंबई - संरक्षण दलाचा अभिमान असलेली आयएनएस विक्रांत प्रकरणी ( INS Vikrant ) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमैया यांच्यावर भ्रष्टाचाराचे केले ( Sanjay Raut Allegation Kirit Somaiya )होते. विक्रांत वाचवण्यासाठी दिलेल्या पैशाचा हिशोब मागितला जात आहे. आता राज्यपाल कार्यालयातून हे पैसे भेटले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता किरीट सोमैयांच्या विक्रांत बचाव मोहिमेसाठी 11 रुपये दिले होते. म्हणून याप्रकरणी माझी फसवणूक झाल्याचा आरोप महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंग सेंगर यांनी किरीट सोमैयांवर लावला ( Karni Sena Allegation Kirit Somaiya ) आहे.
युद्ध नौका विक्रांत बचाव मोहीम किरीट सोमैयांनी ( Kriti Somaiya On INS Vikrant ) काढली होता. या वेळी मी घाटकोपर येथे ११ रुपये किरीट सोमैयांच्या कडील डब्यामध्ये टाकले होते. सदर निधी राज्यपाल कोष मध्ये जमा करणार, असे मला सांगितले होते. परंतु, आज सकाळी टीव्ही वरील बातम्या वरून असे समजले की सदर निधीचा अपहार झाला आहे. राज्यपाल कार्यालय व कोष मध्ये सदर निधी जमा झाला नाही, असे राज्यपाल कार्यालयने स्पष्ट केले आहे. त्याची प्रत आहे, माझ्या कष्टाचे रु ११ ची फसवणूक झाली आहे. याबाबत आपण चौकशी करावी व किरीट सोमैयांवर भादस ४२० आणि इतर योग्य तो गुन्हा नोंदवावा अशी विनंती आहे.
संजय राऊतांनी केले आरोप - 2013-14 साली देशाच्या संरक्षण दलाचा अभिमान असलेली आयएनएस विक्रांत भंगारात काढण्याची तयारी सुरु होती. तेव्हा किरीट सोमैयांनी भाजपाता झेंडा घेऊन सेव्ह विक्रांत नावाने मोहिम सुरु केली. लाखो-करोडो मुंबईकरांकडून कोट्यवधी रुपये जमा केले. पण, या रकमेचे पुढे काय झाले? आयएनएस विक्रांत तर भंगरात गेली. तेव्हा 57 कोटी रुपये अशी ही रक्कम सांगण्यात आली होती. प्रत्यक्षात 100 कोटींपेक्षा जास्त रक्कम सोमैयांनी घशात घातली, हा देशद्रोहाचा गुन्हा आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला.
कितीही चौकशा करा - संजय राऊतांनी केलेल्या आरोपानंतर बोलताना किरीट सोमैया म्हणाले की, यापूर्वीही १७ वेळा माझ्यावर आरोप करण्यात आले. पण, काही निष्पन्न झाले नाही. ही १८ वी वेळ आहे. मी काही केले असेल तर त्याची चौकशी करावी. सर्व कागद पत्रे उद्धव ठाकरे यांना द्यावीत. ते चौकशी करतील, मी कोणालाही घाबरत नाही. कारण मी काही खोटे केले नाही, असे सोमैयांनी म्हटले आहे.
हेही वाचा - First Case XE Variant : भारतामध्ये 'एक्सई'चा या व्हेरियंटचा पहिला रुग्ण मुंबईत