मुंबई - दिंडोशी येथील मुंबई-सत्र कोर्टात कंगनाने धाव घेतली आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या गुन्हेगारी मानहानी खटल्यात अंधेरी येथील महानगर दंडाधिकाऱ्यांनी आदेश दिला आहे. या आदेशाला आव्हान देण्यासाठी कंगनाने कोर्टात धाव घेतली. जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात हे वॉरंट देण्यात आले आहे.
जामीनपत्र वॉरंट जारी-
अंधेरीच्या मेट्रोपॉलिटन दंडाधिकाऱ्यांनी अभिनेत्रीविरोधात जामीनपत्र वॉरंट जारी केले आहे. वास्तविक, कोर्टाने समन्स पाठवूनही न्यायालयात हजर न झाल्यामुळे कोर्टाने हे पाऊल उचलले आहे. बॉलिवूड गीतकार जावेद अख्तर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये जावेद अख्तरने सांगितले होते की, कंगनाने त्यांच्यावर कोणताही आधार न घेता खोटे विधान केले आहे. ज्यामुळे त्यांच्या प्रतिमेला इजा झाली आहे.
जावेद अख्तरने हृतिक रोशनसोबतच्या तिच्या कथित संबंधांबद्दल मौन बाळगण्याची धमकी दिली होती, असा दावा कंगनाने केला होता. यामुळे जावेद अख्तरच्या सार्वजनिक प्रतिमेचे नुकसान झाले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा- एमपीएससी परीक्षेबाबत आठवडाभरात मुख्यमंत्री देणार स्पष्टीकरण