ETV Bharat / city

Kangana Ranaut statement : कंगनाने केले महात्मा गांधींवर आरोप, म्हणाली.... - कंगनाने केले महात्मा गांधींवर आरोप

इंस्टाग्रामवरील पोस्ट्सच्या माध्यमातून कंगनाने यांनी यावेळी महात्मा गांधींवर निशाणा साधला आणि आपल्या नायकांना हुशारीने निवडा, असेही तिने म्हटले आहे. मणिकर्णिका अभिनेत्यांनी अजूनही तिच्या वक्तव्यांमुळे वादळाच्या भवऱ्यात आहे. आज तिने 'गांधी, इतरांनी नेताजींना सोपवण्यास सहमती दर्शविली होती' या मथळ्याची जुनी बातमी क्लिप शेअर केली आहे.

कंगना
कंगना
author img

By

Published : Nov 17, 2021, 1:02 AM IST

Updated : Nov 17, 2021, 7:26 AM IST

मुंबई - वादाचा धुमाकूळ कायम ठेवत अभिनेत्री कंगना रणौतने मंगळवारी (Kangana Ranaut statement) दावा केला आहे, की सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना महात्मा गांधींकडून (Allegations against Mahatma Gandhi) पाठिंबा मिळाला नाही. शिवाय कंगनाने गांधीजींच्या अहिंसेच्या मंत्राची खिल्ली उडवत, दुसरा गाल अर्पण केल्याने (थापड खाल्याने) स्वातंत्र्य "भीक" मिळत नाही, असे म्हटले आहे.

कंगना रणौतने गेल्या आठवड्यात भारताला स्वातंत्र्य मिळाले नसून ती 'भीक' होते असे म्हटले होते. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यावर खरे स्वातंत्र्य मिळाले, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. इंस्टाग्रामवरील पोस्ट्सच्या माध्यमातून कंगनाने यावेळी महात्मा गांधींवर निशाणा साधला आणि आपल्या नायकांना हुशारीने निवडा, असेही तिने म्हटले आहे. कंगना अजूनही तिच्या वक्तव्यांमुळे वादळाच्या भवऱ्यात आहे. आता तिने 'गांधी व इतरांनी नेताजींना सोपवण्यास सहमती दर्शविली होती' या मथळ्याची जुन्या बातमीची क्लिप शेअर केली आहे. या क्लिपमध्ये असा दावा करण्यात आला आहे, की गांधी, जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना यांच्यासमवेत एका ब्रिटीश न्यायाधीशाचा करार झाला. जर बोस देशात प्रवेश करतील तर ते त्यांना त्यांच्या ताब्यात देतील, असाही कंगनाने तिच्या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे.

कंगनाचे आणखी एक वादग्रस्त विधान

'एकतर तुम्ही गांधींचे चाहते आहात किंवा नेताजीचे समर्थक, तुम्ही दोघेही असू शकत नाही. निवडा आणि निर्णय घ्या,' असे कंगना रणौतने म्हटले आहे. कंगनाने दोन मोठ्या पोस्ट केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये कंगना म्हणते, 'ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्यांना सत्तेच्या भुकेल्या आणि धूर्त लोकांनी त्यांच्या मालकांच्या स्वाधीन केले होते. यांच्यात लढण्याची ताकद आणि हिंमत नव्हती, त्यांचे रक्तही उसळत नव्हते. हेच लोक आम्हाला शिकवतात की कोणी तुमच्या एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा. याच प्रकारे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. पण स्वातंत्र्य असे मिळत नसते. अशा प्रकार फक्त भीक मिळत असते. त्यामुळे आपले आदर्श निवडताना काळजी घ्या. हुशारीने आपले आदर्श निवडा,' असे कंगनाने म्हटले आहे

दुसऱ्या पोस्टमध्ये कंगनाने थेट महात्मा गांधीवर हल्ला केला आहे. कंगना रणौत म्हणते, 'गांधींनी कधीही नेताजी आणि भगतसिंगांना समर्थन दिलेले नाही. भगतसिंगांच्या फाशीला गांधींचा पाठिंबा होता, असे बरेच पुरावे आहेत. यामुळे कोणाला पाठिंबा द्यावा आणि कोणाचे समर्थन करावे हे ठरवले पाहिजे. कारण हे सर्व मनात ठेवून त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणे पुरेसे नाही. हे शांत राहाणे अतिशय बेजबाबदारपणाचे आहे. प्रत्येकाला त्यांचा इतिहास आणि आदर्श माहित असले पाहिजे, हे आवश्यक आहे.' असेही कंगनाने म्हटले आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कंगनाला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर दोन दिवसांनी तिने स्वातंत्र्याल भीक म्हटले होते. तिने स्वातंत्र्या संदर्भातील विधान एका वृत्तवाहिनीवर केले होते. तेव्हापासून तिच्यावर टीका होत आहे. अनेक अभिनेते आणि नागरिकांनी तिच्या विधानावरुन पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची मागणी केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रणौत हिच्या विधानांची आपण दखल घ्यायलच नको. असे विधान केवळ प्रसिद्धीसाठी केल्या जाते. हे कोणी कसे प्रकाशित करू शकते? आपण त्याची दखलही घेऊ नये. आपण त्याकडे लक्ष द्यायला हवे का? अशा विधानांना महत्त्व देऊ नये. खरे तर त्याची खिल्ली उडवली पाहिजे, असेही नितीश कुमार म्हणाले. असे असले तरी रविवारी तिच्या त्या विधानाचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केले होते. आता तिने केलेल्या दोन्ही पोस्टबद्दल कोण काय म्हणते हे पाहाणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा - कंगना रणौत जे बोलली, त्याच्याशी मी सहमत; विक्रम गोखलेंकडून पाठराखण

Last Updated : Nov 17, 2021, 7:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.