मुंबई - मुंबई ( Mumbai ) गुन्हे शाखेनं गोरेगाव परिसरामध्ये एका व्यक्तीला 3 देशी बनावटीचे पिस्तूलसह 9 जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी शंकर तुळशीराम भर उर्फ भारद्वाज (27) या आरोपीला अटक ( Accused arrested ) केली आहे. आरोपीने उत्तर प्रदेश ( Uttar Pradesh ) मधून शस्त्र आणले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. मुंबई क्राईम ब्रांचच्या युनिट 11 या कांदिवलीच्या पथकानं गोरेगावच्या बांगूर नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अटकेची कारवाई केली. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एकूण तीन देशी बनावटीच्या पिस्तुलांसह 9 जिवंत काडतूस पोलिसांनी हस्तगत केली. छामेमारी करत ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपीच्या गोरेवाव येथील घरावर छापा टाकण्यात आला. 27 वर्षीय तरुणाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे.
मुंबई गुन्हे शाखा युनिट 11 कांदिवलीच्या पथकाने बांगूर नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापेमारी केली. एका आरोपीच्या घरावर छापा टाकून तीन देशी बनावटीच्या पिस्तुलांसह 9 जिवंत काडतुस जप्त छापेमारीत जप्त करण्यात आली.या पथकाला उत्तर प्रदेशातून एक व्यक्ती काही शस्त्रांसह मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाली होती.
गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या क्रांती चाळ भगतसिंग नगर गोरेगाव पश्चिम येथील घरावर छापा टाकला. आरोपीकडून सॅमसंगच्या बॅगेत ठेवलेली तीन देशी बनावटीची पिस्तुल आणि 9 जिवंत काडतुस यावेळी जप्त करण्यात आली. शंकर तुळशीराम भर उर्फ भारद्वाज असे अटक आरोपीचे नाव असून त्याचे वय 27 वर्षे आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वी देखील बांगूर नगर पोलिस ठाण्यात दोन आणि ओशिवरा पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. शस्त्र कायद्यांतर्गत अटक करून आरोपीला पुढील तपासासाठी बांगूर नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दुसरीकडे बांगूर नगर पोलिस आता आरोपीकडून मुंबईत एवढी शस्त्रे का आणली आणि त्यामागचा हेतू काय याचा तपास करत आहेत.