ETV Bharat / city

राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार; कालिदास कोळंबकरांना विश्वास

author img

By

Published : Oct 12, 2019, 1:21 PM IST

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विजयी होतील, असा विश्वार कालीदास कोळमकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला.

कालिदास कोळंबकर

मुंबई - देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही संकल्पना जनमानसात रुजली असून आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बहुमताने विजयी होतील. जनतेच्या आशीर्वादावर सातवेळा वडाळा विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले आहे. पुन्हा एकदा जनता मलाच कौल देईल असा विश्वास महायुतीचे उमेदवार कालिदास कोळंबकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला.

शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजप हा परिस्थितीनुसार पक्ष बदलाचा निर्णय घेतला असून माझी जनतेप्रती असलेली बांधिलकी कायम आहे. म्हणूनच सातत्याने वडाळा विधानसभेतील जनता मला निवडून देत असल्याचे कालिदास कोळंबकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकास पुरुष असून वडाळा विधानसभेतील सर्व प्रलंबित पुनर्विकास आणि दुरुस्तीचे प्रश्न मार्गी लावण्याचे त्यांनी मला आश्वासन दिले आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने विकास कामांना गती मिळत आहे. माझ्या जनतेला न्याय मिळण्यासाठी भाजप हाच पर्याय दिसल्याने मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक शिवसेनेमध्ये असलेली नाराजी आता दूर झाली असून महायुती म्हणून माझे स्थान पक्के आहे, त्यामुळे मीच निवडून येणार आहे.

जनता माझ्यासोबत आहे त्यामुळे निश्चितपणे भरघोस मते देऊन येत्या 21 ऑक्टोबरला जनता मदत देईल. 24 ऑक्टोबरला दिवाळी साजरी करण्यासाठी महायुती सज्ज असेल, असा विश्वास कालिदास कोळंबकर यांनी शेवटी व्यक्त केला.

Intro:mh_mum_1wadala_180kakudaskolmbkar121_7204684

Body:देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही संकल्पना जनमानसात रुजली असून आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बहुमताने विजयी होतील.जनतेचा आशीर्वाद आशीर्वादावर सातवेळा सात वेळा वडाळा विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे पुन्हा एकदा जनता मलाच कौल देईल असा विश्वास महायुतीचे उमेदवार कालिदास कोळंबकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला. शिवसेना काँग्रेस आणि आता भाजप हा परिस्थितीनुसार पक्ष बदलाचा निर्णय घेतला असून माझी जनतेप्रती असलेली बांधिलकी कायम आहे म्हणूनच सातत्याने वडाळा विधानसभेतील जनता मला निवडून देत असल्याचा कालिदास कोळंबकर यांनी सांगितले .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकास पुरुष असून वडाळा विधानसभेतील सर्व प्रलंबित पुनर्विकास आणि दुरुस्तीचे प्रश्न मार्गी लावण्याचे त्यांनी मला आश्वासन दिले आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने विकास कामांना गती मिळत आहे माझ्या जनतेला न्याय मिळण्यासाठी भाजप हाच पर्याय दिसल्याने मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे . स्थानिक शिवसेनेमध्ये असलेली नाराजी आता दूर झाले असून महायुती म्हणून माझे स्थान पक्के आहे त्यामुळे मीच निवडून येणार आहे.
जनता माझ्यासोबत आहे त्यामुळे निश्चितपणे भरघोस मते देऊन येत्या 21 ऑक्टोबर रोजी जनता मदत देईल आणि 24 ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरा करण्यासाठी माहिती महायुती सत्य असेल, असा विश्वास कालिदास कोळंबकर यांनी शेवटी व्यक्त केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.