ETV Bharat / city

Kalicharan Maharaj Statement : महात्मा गांधींबद्दल अपशब्द, कालीचरण महाराजांवर मलिकांची कारवाईची मागणी - Nawab Malik On Obc Reservation

छत्तीसगड मधील धर्मसंसदेत बोलताना कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी ( kalicharan Maharaj On Mahatma Gandhi ) यांच्याबद्दल अपशब्द वापरले आहेत. तसेच, नथुराम गोडसे याचे गांधीजींची हत्या केल्याबद्दल आभार मानले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, मंत्री नवाब मलिक यांनी कारवाईची मागणी केली आहे ( Nawab Malik Demand Action On Kalicharan Maharaj ).

मंत्री नवाब मलिक
मंत्री नवाब मलिक
author img

By

Published : Dec 27, 2021, 2:10 PM IST

मुंबई : छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे दोन दिवसीय 'धर्म संसद' ( Chhattisgarh Dharam Sansad ) आयोजित करण्यात आली होती. देशभरातून धर्माचे अनुयायी आणि महामंडलेश्वर यात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात संबोधित करताना कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्या ( kalicharan Maharaj On Mahatma Gandhi ) बद्दल अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यावरती आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक ( Ncb Nawab Malik ) यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. "हा महात्मा गांधी यांचा नाही तर देशाचा अपमान आहे. कालीचरणवर देशद्रोहाचा खटला दाखल करावा," अशी मागणी त्यांनी केली ( Nawab Malik Demand Action On Kalicharan Maharaj ) आहे.

प्रसारमाध्यामांशी संवाद साधताना नवाब मलिक म्हणाले की, "ज्या प्रकारे छत्तीसगड मध्ये बनावट साधू कालीचरण याने महात्मा गांधी ( kalicharan Maharaj On Mahatma Gandhi ) यांचा अपमान केला आहे. त्यांना शिवीगाळ केली आहे. हा महात्मा गांधी यांचा नाही तर देशाचा अपमान आहे. कालीचरण याच्यावर देशद्रोहाचा खटला भरला जावा. तो महाराष्ट्रातील अकोल्याची असल्याची माहिती मिळत आहे. आम्ही कालीचरण याच्यावर गुन्हासाठी राज्य सरकारला अवगत करणार असल्याचेही त्यांनी म्हटलं."

ओबीसी आरक्षण संदर्भात ठराव

ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर हा मुद्दा आता राज्यासाठी महत्त्वाचा झाला आहे. जो पर्यंत इम्पिरिकल डेटा ( Obc Reservation Empirical Data ) जमा केला जात नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका घेतल्या जाऊ नयेत, असा ठराव आज विधानभवनात आम्ही एकमताने मांडणार आहोत. आता सर्व निवडणुका खुल्या प्रवर्गातून होणार असल्याने तसे होऊ नये, अशी आमची मागणी असल्याचेही नवाब मलिक ( Nawab Malik On Obc Reservation )यांनी सांगितले.

काय म्हणाले कालीचरण?

अकोला येथील असणाऱ्या कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी याच्यांवर धर्म संसदेत बोलताना शिव्यांची लाखोली वाहिली. तसेच, पुढे कालीचरण महाराजाने नथुराम गोडसे याचे गांधीजींची हत्या केल्याबद्दल आभार मानले. कालीचरण महाराजाच्या या विधानामुळे सर्व स्तरातुन संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा - Maharashtra Vidhimandal Assembly Session : 'सरकार हरवलं आहे'चा सदरा घालून आमदार मंगेश चव्हाण विधानभवनात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.