ETV Bharat / city

यापुढे चुकीला माफी नाही, जितेंद्र आव्हाड यांचा इशारा - फोन टॅपिंग प्रकरण

यापुढे कोणाच्याही चुकीला माफी मिळणार नाही, असा सूचक इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला आहे. ते आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत बोलत होते.

यापुढे चुकीला माफी नाही, जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

author img

By

Published : Mar 25, 2021, 7:07 PM IST

Updated : Mar 25, 2021, 7:34 PM IST

मुंबई - फोन टॅपिंग प्रकरणात गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांची माफी मागून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारनेही सहानुभूती दाखवत शुक्ला यांना मोठ्या मनाने माफ केले. याचाच गैरफायदा त्यांनी घेतला. मात्र यापुढे कोणाच्याही चुकीला माफी मिळणार नाही, असा सूचक इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला आहे. ते आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत बोलत होते.

फोन टॅपिंग करणे, ही विकृती-

महाविकास आघाडी सरकार स्थापनेआधी राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांना भाजपमध्ये येण्यासाठी गुप्त विभागाच्या तत्कालीन रश्मी शुक्ला धमकावत होत्या. स्थानिक डीवायएसपी यांनी देखील 'हमारे साथ चाय पीओगे तो, कोई नमक हरामी हो जायेगी क्या', असा शब्दांत यड्रावकर यांना धमकावत होते. तसेच गुप्तचर विभागामार्फत त्यांच्या हालचालीवर देखरेख आणि फोन टॅपिंग करण्यात येत होते. फोन टॅपिंग करणे, ही विकृती आहे. तसेच फोन टॅप करण्याचा कोणालाही अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालयाचे त्यासाठी काही निकष आहेत. रश्मी शुक्ला यांनी या निकषांची पायमल्ली केली आहे, असे आव्हाड म्हणाले. या सर्व प्रकरणाबाबत चौकशी सुरू असून लवकरच कारवाई केली जाईल, असे आव्हाड म्हणाले.

मला माफ करा-

रश्मी शुक्ला यांनी संबंधित पत्राबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यापुढे ढसा ढसा रडल्या. हातापाया पडून माफी मागितली. तसेच हे पत्र पुढे येणार नाही, अशी ग्वाही दिली. राज्य सरकारनेही सहानुभूतीने त्यांना माफ करून टाकलं. मात्र शुक्ला यांनी तब्बल ९ महिन्यांनंतर पत्र बाहेर काढून राजकारण केले. आतापर्यंत सरकारने सहानुभूती दाखवली, परंतु, यापुढे कोणालाही माफी मिळणार नाही, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.

काहींना गर्दी कमी होईल, त्याची भीती-

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून काहीजण ३६ तासांत सरकार कोसळेल, आणि राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे सांगत आहेत. कारण आपल्या आजूबाजूची गर्दी कमी होईल, अशी काहींना भीती वाटते, असा टोला आव्हाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.

हेही वाचा- वाझे-हिरेन भेटीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर; हत्याकांडसंदर्भात पुढे आले मोठे खुलासे

Last Updated : Mar 25, 2021, 7:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.