ETV Bharat / city

MH Assembly Budget Session : मुंबईत आमदारांसाठी होणार गृहप्रकल्प, मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

author img

By

Published : Mar 24, 2022, 9:22 PM IST

मुंबई महानगरातील आमदार वगळता राज्यातील अन्य आमदारांसाठी मुंबईत गोरेगाव येथे गृहप्रकल्प ( Goregaon Housing project For MLA ) साकारला जाईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad Spoke In Assembly ) यांनी आज विधानसभेत केली. नियम 293 अन्वये खाली झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.

Goregaon Housing project For MLA
Goregaon Housing project For MLA

मुंबई - मुंबई महानगरातील आमदार वगळता राज्यातील अन्य आमदारांसाठी मुंबईत गोरेगाव येथे गृहप्रकल्प ( Goregaon Housing project For MLA ) साकारला जाईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad Spoke In Assembly ) यांनी आज विधानसभेत केली. नियम 293 अन्वये खाली झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. विधानसभेत सत्ताधारी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या नियम 293 अन्वये खालील चर्चेला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी विविध प्रश्नांना स्पर्श केला. मुंबईतील सर्वसामान्यांच्या घरांचा प्रश्न सोबतच राज्यातील आमदारांसाठी मुंबई गृहप्रकल्प उभारण्यात येईल. गोरेगाव येथे हा प्रकल्प उभारला जाणार असून याबाबतचा भूखंड म्हाडाच्या ताब्यात आहे. ही घरे ग्रामीण भागातून येणाऱ्या आमदारांना दिली जाणार असून 300 घरांची निर्मिती होणार असल्याचे त्यांनी विधानसभेत सांगितले.

कामाठीपुरासाठी क्लस्टर योजना : मुंबईतील कामाठीपुरा येथे सुमारे 100 वर्षांपेक्षा अधिक जुनी घरे आहेत. अतिशय छोट्या जागेत येथील लोक राहत असून कामाठीपुरा कडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. ब्रिटिशांनी या भागात तेलंगणाहून कामाठी लोक घरे बांधणीसाठी आणली होती, म्हणून या भागाला कामाठीपुरा असे नाव पडले आहे. या भागाचा क्लस्टर योजनेच्या माध्यमातून विकास करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बीडीडी चाळींच्या पुनर्विकास योजनेचे नामकरण : दगडी चाळीची योजना कार्यान्वित झालेली असून आता वरळी येथील बीडीडी चाळीचे नामकरण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नगर, असे करण्यात येणार आहे. नायगाव येथील बिडीचा इला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव देण्यात आले आहे. तर नामजोशी मार्गावरील बीडीडी चाळीना दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी नगर, असे नामकरण करण्यात येणार आहे. तसेच पत्रा चाळ यापुढे सिद्धार्थनगर म्हणून ओळखले जाईल, असेही त्यांनी सभागृहात सांगितले.

महिलांसाठी वसतिगृहाची निर्मिती : गेल्या पन्नास ते साठ वर्षात मुंबईत वस्तीगृह निर्माण झालेली नाहीत. देशभरातून विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेण्यासाठी मुंबईत येतात. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी एक नवे वसतिगृहे बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १९ कोटी रुपये खर्च करून 23 मजल्यांची एक इमारत बांधण्यात येत आहे. या कामालाही आता सुरुवात करण्यात आली आहे, तर ताडदेव येथे 32 कोटी रुपये खर्च करुन 928 महिला राहू शकते, अशी इमारत बांधण्यात येत आहे. पालघर येथे शासकीय वृद्धाश्रम बांधण्याचा सरकारचा विचार असून मुंबईतील लीलावती रुग्णालयाच्या शेजारील भूखंडावर जागतिक दर्जाचे प्राण्यांसाठी रुग्णालय बांधण्यात येणार आहे, तर मुंबईकरांसाठी जोगेश्वरी पश्चिम येथे एक जागतिक दर्जाचे हॉस्पिटल बांधण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मुंबईतील कोळीवाड्यांचे सीमांकन करून त्यांना वेगळी पुनर्विकास योजना देण्यात येणार आहे. कोळीवाड्यांना नवीन डीपी सीआर लागू केला जाईल. तसेच कोळीवाड्यांना एसआरए योजना लागू केली जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - Prasad Lad In Legislative Council : कॉलेजमध्ये असताना प्रेमप्रकरण करून आमदाराच्या मुलीला पळवून लग्न केले - प्रसाद लाड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.