मुंबई - कोरोनाच्या संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना कामाला लागली आहेत. लोकांच्या खिशात पैसे नाहीत. त्यांना कामे करू द्या. महाराष्ट्र शांत आहे, कुठेही क्लेश नाही, द्वेश दिसत नाही, सर्व समाज एकत्र वावरत असताना विणाकारण महाराष्ट्र पेटेल असे वक्तव्य करू नका, अश्या शब्दात राज ठाकरे यांच्यावर बोचरी टिका करत जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad on Raj Thackeray ) यांनी आव्हान केले.
जितेंद्र आव्हात यांची टीका - गॅस महाग झालाय, पेट्रोल - डिझेल महागलेय, भाज्या, केरोसिन महाग झाले... खाण्यापिण्याच्या वस्तूपासून सर्वच महाग झाले आहे. याबाबत काही बोलत नाहीत. मात्र जे गरजेचे नाही ते मुद्दे बनवले जात असून मुख्य विषयापासून दुसरीकडे नेण्याचे काम सुरू आहे. गॅसबद्दल... पेट्रोल - डिझेल महागाई याबद्दल बोला. ही महागाई गरीबांना किती खाते आहे याबद्दल बोला. श्रीराम जरूर म्हणा परंतु लोकांना 'राम नाम सत्य है' बोलायला लावू नका असा टोला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. प्रसारमाध्यमांशी प्रदेश कार्यालयात संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणाचा समाचार घेतला. तसेच महाराष्ट्र शांत आहे. कुठेही क्लेश नाही, द्वेष दिसत नाही, सर्व समाज एकत्र वावरताना असताना महाराष्ट्र पेटेल असे काही वक्तव्य करू नका अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
हेही वाचा - Alternative Fuel Council Pune : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पुण्यातील पर्यायी इंधन परिषदेचे कौतुक