ETV Bharat / city

Jaydeep Thakre : उद्धव ठाकरे यांच्या मदतीला धावला कुटुंबातील ठाकरे सदस्य, शिवाजी पार्क मैदानावर लावली हजेरी

जयदेव ठाकरे यांचे पुत्र जयदीप ठाकरे यांनी दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर हजेरी लावली. कठीण काळात आपण उद्धव ठाकरे कुटुंबासोबत आहोत. ( Jaydeep Thakre support uddhav thakre in difficult time )मी कधीही राजकारणात सक्रिय नव्हतो. मात्र सध्याची कठीण परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पक्षाची एखादी जबाबदारी आपल्याला दिल्यास समर्थपणे आपण ती पार पाडण्यासाठी प्रयत्न करू, असे मत जयदीप ठाकरे यांनी व्यक्त केल आहे.

Jaydeep Thakre support uddhav thakre in difficult time
जयदेव ठाकरे यांचे पुत्र जयदीप ठाकरे यांनी दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर हजेरी लावली. कठीण काळात आपण उद्धव ठाकरे कुटुंबासोबत आहोत, असे त्यांनी सांगितले.
author img

By

Published : Oct 9, 2022, 11:21 AM IST

मुंबई - शिवसेनेत सध्या मोठी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार यांच्या सोबत बंडखोरी ( Eknath Shinde rebelled with 40 Shiv Sena MLAs ) करत खरा शिवसेना पक्ष आपल्याच असल्याचा दावा केला आहे. नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यातही दोन दसरा मेळावे पाहायला मिळाले. शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावर झाला असून एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारासहित मुंबईच्या बीकेसी मैदानावर दुसरा दसरा मेळावा पार पडला. यावेळी बिंदा ठाकरे यांचे पुत्र निहार ठाकरे, जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती. मात्र दुसरीकडे शिवाजी पार्क मैदानावर जयदेव ठाकरे यांचे पुत्र जयदीप ठाकरे यांनी हजेरी लावली. तसेच आपण काका उद्धव ठाकरे यांच्यासोबत ( Jaydeep Thakre support uddhav thakre ) असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

कठीण वेळी कुटुंबासोबत - शिवसेनेत मोठी बंडखोरी झाल्यामुळे ठाकरे कुटुंबावर आज कठीण वेळ आहे. कुटुंबचा घटक म्हणून मला कुटुंबासोबत एकत्र राहणं गरजेचे आहे. यामुळे आपण आपले चुलते उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत.( Jaydeep Thakre support uddhav thakre in difficult time ) आपण कधीही राजकारणात सक्रिय नव्हतो. मात्र सध्याची कठीण परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पक्षाची एखादी जबाबदारी आपल्याला दिल्यास समर्थपणे आपण ती पार पाडण्यासाठी प्रयत्न करू, असे देखील मत जयदीप ठाकरे यांनी व्यक्त केल आहे.

वडिल जयदेव ठाकरेंशी संपर्क नाही - दसरा मेळाव्याला आपले वडील जयदेव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या सोबत बीकेसी मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्यात का उपस्थित होते ?, याबाबत आपल्याला माहीत नाही. बराच काळापासून आपला त्यांच्याशी कोणताही संपर्क नाही असे देखील जयदीप ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तसेच येणाऱ्या पुढील काळात आपण शिवसेनेसोबत राजकारणात सक्रिय होऊ असे संकेतही दिले आहेत. सध्या आपण क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून आपण सध्या कलाक्षेत्रात काम करत असल्याचे देखील जयदीप ठाकरे यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.