ETV Bharat / city

Jayant Patil Vs Raj Thackeray : वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा अन् विचारसरणी गोडसेची; जयंत पाटलांचा राज ठाकरेंवर पलटवार - Jayant Patil

वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा. मात्र, विचारसरणी नथुराम गोडसेची अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Jayant Patil Vs Raj Thackeray) राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर पाटील यांनी ट्वीट करत राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

जयंत पाटील
जयंत पाटील
author img

By

Published : Apr 13, 2022, 12:48 PM IST

मुंबई - वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा. मात्र, विचारसरणी नथुराम गोडसेची अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर पाटील यांनी ट्वीट करत राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (2014)ला मोदींना पाठिंबा दिला, (2019)ला मोदींना विरोध आणि आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर अशा शब्दांत पाटील यांनी राज यांच्यावर टीका केली आहे.

जयंत पाटील यांचे ट्विट
जयंत पाटील यांचे ट्विट

राजकीय पक्षांनी लक्ष्य केले होते - मशिदींवरील भोंग्यांचा त्रास संपूर्ण देशाला होत आहे. येत्या ३ मे रोजी ईद आहे. या तारखेपर्यंत सरकारने मौलवींशी चर्चा करून भोंगे उतरवावेत. अन्यथा, मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असा निर्वाणीचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (दि. 12 एप्रिल)रोजी झालेल्या ठाण्यातील सभेत राज्य सरकारला दिला. शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावरून राज यांना राजकीय पक्षांनी लक्ष्य केले होते. त्यावर राज यांनी ठाण्यात 'उत्तर सभा' घेतली.

मोदींनी काही चुकीच केले तर मी परत बोलेन - बाळासाहेब ठाकरे यांचा पुतण्या. मात्र, नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी. तसेच, वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस सध्या महाराष्ट्रात वाढत आहेत असही जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये आपण पंतप्रधान मोदींची भूमिका आवडली नाही की उघडपणे बोलतो असे सांगितलं होते. उद्या नरेंद्र मोदींनी काही चुकीच केले तर मी परत त्यांच्याविरोधात बोलेन, असही ते म्हणाले आहेत. राज यांनी छगन भुजबळ, अजित पवार, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा - Safety Audit Of Ropeway : केंद्र सरकारला आली जाग! रोपवे दुर्घटनेनंतर 'सेफ्टी ऑडिट' करण्याचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.