मुंबई - जय हो या मोहिमेची सुरुवात आजपासून देशभर राबवली जाणार आहे. ''ह्या मोहिमेचे उदघाटन माजी मुंबई पोलीस आयुक्त डी शिवानंद, ( D. Shivananda ) मेजर जनरल श्रीनिवासन राव , प्रसिद्ध गायक रुपकुमार राठोड यांच्या उपस्थितीत झाले. प्रसिद्ध गायक रूप कुमार राठोड यांनी संदेसे आते है ... हे लोकप्रिय गीत गाऊन कार्यक्रमात रंगत आणली. तसेच मुंबई विद्यापीठातील जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ श्रीनिवासां अयंगार यांनी देखील कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली.
हेही वाचा - Draupadi Murmu Wins : भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड.. यशवंत सिन्हा पराभूत
राष्ट्रगीताने सन्मान - माजी मुंबई पोलीस आयुक्त डी. शिवानंद ( Former Mumbai Police Commissioner D. Shivananda ) यांनी सांगितले. या मोहिमेचा उद्देशाबाबत मेजर जनरल श्रीनिवासन राव यांनी सांगितले की, 'सीमेवर लढणारे सर्व प्रकारचे जवान, ( Indian Army ) अधिकारी ज्यांच्यामुळे आपण सुखाने,शांतीने आपल्या देशामध्ये राहतो. तसेच कोविड-19 या महामारीमध्ये जे सर्वात अग्रणी म्हणून लढणारे वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर विविध तळपातळीवरचे कामगार नर्सेस त्याचबरोबर भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्य सैनिक या सगळ्यांच्यामुळे आपण आज आहोत. म्हणून येत्या १४ ऑगस्ट २०२२ रोजी आपण आपल्या घरातून काही मिनिटे त्यांच्या योगदानाला स्मरून आपल्या राष्ट्रगीताने त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे. हा कार्यक्रम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आणि आय स्टँड फॉर वारीयर्स संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजिला होता .
हेही वाचा - Draupadi Murmu : नगरसेविका ते देशाच्या प्रथम नागरिक; वाचा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा राजकीय प्रवास