ETV Bharat / city

IT Raid Shivsena Leader Rahul Kanal : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाची धाड - राहुल कनाल यांच्यावर आयकर विभाग छापेमारी

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारली आहे. यशवंत जाधव यांच्यानंतर मातोश्रीच्या जवळच्या व्यक्ती राहुल कनाल यांच्यावर छापेमारी झाल्याने एकच खळबळ उडाली ( IT Raid Shivsena Leader Rahul Kanal ) आहे.

Rahul Kanal
Rahul Kanal
author img

By

Published : Mar 8, 2022, 12:21 PM IST

Updated : Mar 8, 2022, 2:03 PM IST

मुंबई - मुंबई महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारीची घटना ताजी असतानाच शिवसेनेला आणखी धक्का बसला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी आणि मातोश्रीचे अतिशय जवळचे राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली ( IT Raid Shivsena Leader Rahul Kanal ) आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या मुंबईतील घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. तसेच, प्रादेशिक परिवहन विभागाचे वादग्रस्त अधिकारी बजरंग खरमाटे, सदानंद कदम यांच्याही घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकल्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रावर यापूर्वीही आक्रमक झाली आहेत. हे दिल्लीचे आक्रमण आहे. जेव्हापासून निवडणुकीची घोषणा झाल्यापासून महाविकास आघाडीची भीती वाटू लागली आहे. हे उत्तर प्रदेश, हैदराबाद, बंगालमध्येही झाले आहे. आता महाराष्ट्रात सुरु आहे. सगळ्या केंद्रीय यंत्रणा या भाजपाच्या यंत्रणा झाल्या आहेत. महाराष्ट्र झुकणार नाही आणि महाराष्ट्र थांबणारही नाही, असा जोरदार पलटवार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

  • Central agencies misused in the past too, it happened in Bengal, Andhra Pradesh & now it's happening in Maharashtra too. Central agencies have in a way become publicity machinery of BJP itself. Maharashtra will not bow down: State min Aaditya Thackeray on I-T raids in the state pic.twitter.com/V6KUw7ATTf

    — ANI (@ANI) March 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोण आहे राहुल कनाल?

राहुल कनाल हे शिवसेनेचे पदाधिकारी असून, राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांचे निकटवर्तीय समजले जातात. युवासेनाच्या कोअर टीमचे ते सदस्य देखील आहेत. यापूर्वी मुंबई मनपामध्ये ते स्वीकृत सदस्य होते. त्यांच्यावर शिक्षण समितीची जबाबदारीही होती. श्री साई बाबा संस्थानचे विद्यमान विश्वस्त म्हणून ते सध्या कार्यरत आहेत.

यशवंत जाधव यांच्या घरावरही छापेमारी

शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावरही आयकर विभागाने छापेमारी केली होती. सलग चार दिवस त्यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरु होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मातोश्रीच्या जवळच्या व्यक्तीवर धाडी टाकल्याने संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

संजय राऊतांची पत्रकार परिषद

विशेष म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत यांची दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी तपास यंत्राणांची भ्रष्टाचार उघड करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यापूर्वीच धाडी पडल्याने आता एकच खळबळ उडाली आहे. मागील महिन्यात देखील संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेपूर्वी मुंबईतील अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती.

हेही वाचा - NIA Raids In Pune : पुणे कोंढवा परिसरात एनआयएचे छापे, डिजिटल साहित्य जप्त

Last Updated : Mar 8, 2022, 2:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.