मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह ( IT raid on BMC Yashwant Jadhavs home ) त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्या ( MLA Yamini Jadhav ) माझगाव येथील घरी आज प्राप्तिकर विभागाने धाड टाकली आहे. याचबरोबर मुंबई महापालिकेतील कंत्रादारांच्या घर आणि कार्यालय अशा एकूण २५ ठिकाणी धाडी टाकण्यात ( IT raids on 25 properties in Mumbai ) आल्याची माहिती मिळत आहे.
२५ ठिकाणी प्राप्तिकर विभागाच्या धाडी -
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष ( BJP vs Shivsena before election ) पाहायला मिळत आहे. ईडीने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या घरी पहाटे धाड टाकली ( ED raids on Nawab Malik home ) होती. त्याचप्रमाणे शिवसेना उपनेते आणि पालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तिकर विभागाने सकाळी सहा वाजता धाड टाकली ( Income Tax Raids Yashwant Jadhav Home )आहे.
हेही वाचा-Somaiya pre-arrest bail : नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावरची सुनावणी टळली सोमवारी होणार निर्णय
यशवंत जाधव यांच्या माझगावमधील दोन घरांबाबत प्राप्तिकर विभागाचे अधिकारी तपास करत आहेत. त्यासोबत यशवंत जाधव यांचे पीए, पालिकेतील कंत्राटदार यांच्या मुंबईतील एकूण २५ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. या मालमत्तांबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांचा तपास सुरू आहे. माझगाव, काळाचौकी, मालाड, बोरिवली, मुलुंड आदी ठिकाणी या धाडी प्राप्तिकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर मनी लाँडरिंग आणि १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी केंद्रीय यंत्रणांकडे तक्रार केली होती. या अनुषंगाने या धाडी असल्याचे समजते. दरम्यान यशवंत जाधव यांच्यावर १५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांनी यूएईला हलवल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणीही चौकशी सुरू असल्याचे समजते.
तपास यंत्रणा विरोधकांना त्रास देत आहेत -
मुंबई मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mayor Kishori Pednekar on ED ) म्हणाल्या, की ही प्राप्तिकर विभागाची धाड पहिल्यांदाच कुणावर पडली आहे, असे नाही. दरम्यान, प्राप्तिकर विभागाला जी काही माहिती लागेल ती माहिती आमचे यशवंत जाधव देतील. दरम्यान, ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही त्या राज्यात तपास यंत्रणांकडून विरोधकांना त्रास देण्यात येत आहे. 'भाजपमधले सर्व दुध के धुले' आहेत असे नाही.
शिवसैनिकांकडून माझगाव बंद -
प्राप्तिकर विभागाने सकाळी सहा वाजता यशवंत जाधव यांच्या घरी धाड टाकली आहे. त्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले. त्यांच्या राहत्या घराखाली शिवसैनिक जमा झाले होते. काही शिवसैनिकांनी प्राप्तिकर विभागाच्या धाडीच्या निषेध करत माझगाव बंद केले. सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. याच दरम्यान महापौर किशोरी पेडणेकर या या यशवंत जाधव यांच्या राहत्या घरी पोहोचल्या. त्यांनी सर्व शिवसैनिकांना शांत करत शाखेत नेले. त्याठिकाणी कोणीही कायदा हातात घेऊ नका. यशवंत जाधव व यामिनी जाधव या कारवाईला कायद्याने उत्तर देतील असे महापौर म्हणाल्या आहेत.
हेही वाचा-ST Worker Strike : एसटी महामंडळ विलीनीकरणावर मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय काय? उच्च न्यायालयात आज सुनावणी
कोण आहेत यशवंत जाधव -
यशवंत जाधव हे शिवसेनेचे उपनेते आहेत. शिवसैनिक शाखाप्रमुख ते स्थायी समिती अध्यक्षपदापर्यंत त्यांनी पदे भूषवली आहेत. १९९७ मध्ये ते पहिल्यांदा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. जाधव यांनी महापालिकेत अनेक महत्त्वाच्या समित्यांवर काम केले आहे. स्थायी समितीला मुंबई महापालिकेची तिजोरी समजली जाते. यशवंत जाधव यांच्याकडे अध्यक्ष या नात्याने गेले ४ वर्षे या पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. त्यांची पत्नी यामिनी जाधवही नगरसेविका होत्या. सध्या त्या शिवसेनेच्या आमदार आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यावर आज शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तिकर विभागाची धाड पडल्याने चर्चेला उधाण आले आहे.