ETV Bharat / city

बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचे फडणवीस, राज ठाकरे यांना निमंत्रण - राज ठाकरे लेटेस्ट न्यूज मुंबई

23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी दक्षिण मुंबईत पोलीस मुख्यालयसमोर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. पुतळा अनावरण सोहळ्याची जोरदार तयारी सेनेकडून करण्यात येत आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत त्यांना या सोहळ्याचं निमंत्रण दिले आहे.

बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचे फडणवीस, राज ठाकरे यांना निमंत्रण
बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचे राज ठाकरे यांना निमंत्रण
author img

By

Published : Jan 19, 2021, 3:11 PM IST

मुंबई - 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी दक्षिण मुंबईत पोलीस मुख्यालयसमोर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. पुतळा अनावरण सोहळ्याची जोरदार तयारी सेनेकडून करण्यात येत आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत त्यांना या सोहळ्याचं निमंत्रण दिले आहे.

दक्षिण मुंबईत बाळासाहेबांचा पुतळा असावा अशी मागणी केली जात होती. त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वास्तूसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौक येथील जागा निवडण्यात आली होती. मात्र ही जागा छोटी पडल्याने जागा बदलण्यात आली. आता हा पुतळा दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वास्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला उपस्थित राहाण्याचे निमंत्रण देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली असल्याची माहिती पेडणेकर यांनी दिली आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेणार असल्याचे त्या म्हणाल्या. शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या सूचनेनुसार सर्व प्रमुख व्यक्तींना निमंत्रण देत आहे. सर्व पक्षीय नेत्यांना निमंत्रण देण्यात येत आहे. आज फडणवीस, राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. पुतळा बसवण्यात थोडा उशीर झाला. अनेक परवानग्या रखडल्या होत्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या हातून बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण होतंय हा योगायोग आहे, असेही पेडणेकर यांनी यावेळी सांगितले.

बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचे फडणवीस यांना निमंत्रण

उद्धव-राज जवळपास पंधरा महिन्यांनी येणार एका मंचावर

उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा जोरदार सोहळा शिवाजी पार्कात संपन्न झाला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आले होते. राज ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका मंचावर दिसले नव्हते. मात्र बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरप्रसंगी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. बाळासाहेबांचा 9 फूट उंचीचा पुतळा 2 फूटांच्या लॅंडस्केप चबुताऱ्यावर उभारण्यात येणार आहे.

23 जानेवारीला अनावरण मात्र स्थानिकांचा विरोध

मुंबईतील कुलाब्यात एम जी रोडवरील डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी चौकात शिवसेनेतर्फे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्यात आला. मात्र स्थानिकाकडून या जागेला विरोध केला जात आहे. सार्वजनिक रस्त्यावर पुतळे बसवले जाऊ नयेत असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय, त्याचाच हवाला इथल्या काही नागरिकांनी दिला आहे. आमचा विरोध हा राजकीय नसून सुरक्षेचा मुद्दा आहे. जेंव्हा महत्त्वाच्या व्यक्तींच्या सन्मानासाठी त्यांना हार चढवले जातात, तेंव्हा रस्ते बंद ठेवावे लागतात. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची प्रतिमा स्थापित केल्यानंतर तिथे अनेक नागरिक सेल्फी घेण्यासाठी देखील येतात. त्यामुळे रहदारीची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. या रस्त्यावर जागा कमी असल्याने कुलाब्यातील स्थानिकांचा या स्थापानेला विरोध आहे असे आपली मुंबई संसंस्थेच्या सदस्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.