ETV Bharat / city

गांधी ही व्यक्ती नव्हे विचार - तुषार गांधी - 150 वी महात्मा गांधी जयंती माहिती

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त ईटीव्ही भारतने २ ऑक्टोंबरपर्यंत प्रत्येक दिवशी त्यांच्या जीवनाशी निगडीत वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे. यात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या विशेषज्ञ यांचे मत आम्ही मांडत आहोत. या संदर्भातच गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांच्याशी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी साधलेला संवाद...

तुषार गांधी आणि महात्मा गांधी
author img

By

Published : Aug 23, 2019, 7:31 PM IST

Updated : Aug 23, 2019, 8:56 PM IST

मुंबई - महात्मा गांधी आज जिवंत असते तर समाजात वाढलेली असहिष्णुता पाहून ते गप्प बसले नसते. त्यांनी तत्परतेने यावर काही तरी उपाय शोधला असता. पण आज असे होत नाही, असे मत गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले, की गांधी विचारसरणी ही फक्त तात्पुरत्या स्वरुपातील नसून ती टिकाऊ स्वरुपाची आहे.

तुषार गांधी यांच्याशी खास बातचीत

गांधी विचारांच्या बाबतीत पाश्चात्य राष्ट्रातील लोकांचा अभ्यास

भारतात एखाद्या महापुरुषाच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना आपण त्या व्यक्तीच्या अस्मितेला कुरवाळत बसतो. विदेशात मात्र, व्यक्तित्वाच्या पलीकडं जाऊन अभ्यास केला जातो. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा, कार्यशैलीचा, तसंच समकालीन प्रश्न सोडवणुकीसाठी त्या विचारांचा आज उपयोग किती, असं त्या अभ्यासाचं स्वरुप असतं. गांधी विचारांच्या बाबतीत पाश्चात्य राष्ट्रातील लोक असाच अभ्यास करतात. अमेरिकी लोकांनी गांधीजींच्या विचारांचं अनुकरण केले आहे. बापूंच्या स्वदेशी या संकल्पनेतला हा आशय आहे. ते लोक संख्येनं कमी आहेत, पण ते आपल्या कृतीवर खूश आहेत. गांधी विचारांवर वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करुन अनेकांनी डॉक्टरेट, पोस्ट डॉक्टरेट पदवी मिळवली. उदाहरणार्थ सुटाबुटातील गांधी ते पंचा नेसणारे गांधी हा त्यांच्या पोषाखातील बदल कसा झाला, यामागं त्यांचं तत्त्वज्ञान काय होतं, याचासुद्धा अभ्यास केला गेला. वसुधैव कुटुंबकमची संकल्पना जगभर स्वीकारली जात आहे. अमेरिका, कॅनडा, युरोपातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये असा अभ्यास होताना दिसतो. नीतीशास्त्राचा अभ्यास करताना गांधीविचारांशिवाय तो होतच नाही. सत्य, अहिंसा आणि बंधुभावाचा एकच विचार सर्वांना एकत्र घेऊन जाणारा आहे, असे तुषार यांनी सांगितले.

जागतिक नेते आणि गांधीजींचे विचार

जागतिक स्तरावर गांधीजींचा आणि एकूणच अहिंसेचा विचार कोण किती मांडते आहे, यापेक्षा मला ते त्या विचारांचं आचरण किती आणि कसं करताहेत, हे महत्त्वाचं वाटतं. ओबामा भाषणांतून मार्टिन ल्युथर किंग आणि मंडेला हे गांधी यांचं नाव घ्यायचे, पण त्यांच्या आचरणात ते दिसून येत नव्हतं. क्षमा सिद्धांतही कुठे दिसला नाही. आज गांधीवर बोलणारे पुष्कळ लोक दिसतात, पण अहिंसेच्या मार्गावरुन खरंच आचरण करणारा राष्ट्रप्रमुख दिसत नाही. महायुध्दानंतर आणखी काही विध्वंस होईल, असं वाटलं नव्हतं. मात्र, आता विध्वंस दिसतो. आपले पंतप्रधान तर गांधीजींचं सतत नाव घेतात. पण प्रत्यक्ष कृती वेगळीच असते, असा उपरोधित टोला तुषार यांनी मोदींना लगावला.

तुषार गांधी यांच्याशी खास बातचीत

तरुण वर्गाला विविध क्षेत्रात उपयोगी पडणारे गांधीजींचे पैलू

तरुणांचे जास्त करुन प्रश्न आजच्या समस्यांबद्दल असतात. आजच्या आमच्या समस्येला गांधीविचारांतून उत्तर कसे मिळेल. हे ते जाणून घेऊ इच्छितात किंवा आजच्या इकॉनॉमिक थिअरीमध्ये गांधी कसे उपयोगी पडू शकतात, याबद्दल विचारत असतात. कॉफ्लिक्ट रेस्झुलेशनच्या संदर्भात जेव्हा ते गांधीजींच्या तत्वज्ञानाला तपासून पाहतात, तेव्हा उत्तर मिळतं, की गांधीजींचं तत्त्वज्ञान हे कॉफ्लिक्टनंतर उत्तर देणारं नाही, तर कॉफ्लिक्ट निर्माणच होऊ नये याची काळजी घेणारं आहे. सिंप्लिसिटी इन इंजिनिअरिंग डिझाईनमध्ये गांधी विचार कसा महत्त्वाचा ठरू शकतो, हे जाणून घेणारे तरुण-तरुणी मला भेटतात. तशी निर्मितीही ते करताना दिसतात. मला त्याच खूप कौतुक वाटतं कारण तो गांधी विचारांना आचरणात आणणारा प्रयोग आहे, असेही तुषार यांनी सांगितले.

गांधी आणि पर्यावरण

तरुण मुलं-मुली आणि प्रौढही गांधींच्या पर्यावरणीय विचारांना जाणून घेतात. शाश्वत विकासाची व्याख्याच अशी आहे. केवळ शाश्वत नव्हे तर नैतिकदृष्ट्या गांधींनी विकासाबद्दल विचार मांडले होते. ते विचार लोक आज समजून घेऊ इच्छितात. विदेशात पर्यावरणविषयक कोर्सेसची जी निर्मिती केली आहे, त्यात गांधीजींचं नाव कुठेही दिसणार नाही, पण जी कोअर आयडिया आहे, ती मात्र गांधीजींची दिसेल. अभ्यासकही गांधींचा संदर्भ घेताना दिसतात.

कट्टरवाद आज पसरत आहे, मात्र, तो कायम टिकणार नाही

संस्कृतीचं एक चक्र असतं. कधी एक टोक पुढं येतं तर कधी दुसरं येतं. एकच टोक कायम राहील असं अजिबात नसतं. लोकांच्या भावनांशी खेळून, राजकारण साधून ते सत्तेत येतात, पण ते दीर्घकाळ सत्तेत टिकू शकतील असं मला अजिबात वाटत नाहीत. ते शाश्वत अजिबात नाहीत. मानवी स्वभाव सहिष्णू आहे. ही सहिष्णुताच कायम टिकू शकते. उग्रवाद हा तत्त्कालीन आहे, तो निश्चित संपतो. हिटलरचं, इंग्लंडचं एकेकाळी दृष्ट साम्राज्य होतं, पण तेही मावळलं. मला असं वाटतं की सद्या ही एक फेज आहे. ती निघून जाणार आहे. पण म्हणून आपण हातात हात घालून बसणं योग्य होणार नाही. आपल्याला त्याला विरोध करावाच लागेल, कार्यरत व्हावंच लागेल. उग्रवादाकडं आपण काही सोपेपणानं जात नाही. भारतात बघा, मोदींनी सुद्धा पंतप्रधान झाल्यावर गांधीजींचं नाव घ्यायला लागलं. त्यांना ठाऊक आहे, की मी जर गांधीजींचं नाव घेतलं नाही, तर लोक मला स्वीकारणार नाहीत. मला सांगायचंय हे की आपली नैसर्गिक प्रकृती ही सहिष्णू आहे. असहिष्णुता ही आपल्याला कृत्रिमपणे आणावी लागते. ती जगात टिकू शकणार नाही. पण जर समाजात असहिष्णुवृत्ती असतील तर त्यांच्याविरोधात आपल्याला सक्रिय राहायला हवं.

तुषार गांधी यांच्याशी खास बातचीत

गुजरातमधील लोक बदलले नाहीत, तर लोकांना बदलवलं गेलं

गुजरातमधील लोक बदलले नाहीत, तर लोकांना बदलवलं गेलं. बापूंनी पण लोकांना बदलवलंच होतं. नाहीतर त्यापूर्वी लोक उदासिन होते. केवळ गुजरातच नव्हे तर सारा देश उदासिन होता. त्यांना विधायक वळण देण्याचं काम बापूंनी केलं. आपल्या कुवतीनुसार आपण स्वातंत्र्याचा लढा लढू शकतो, हे त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवलं. लोक सत्याग्रहात सामील झाले. गांधींनंतर एक पिढी सोडली तर देशात पोकळी निर्माण झाली. ही पोकळी सहिष्णुतेची, सत्याग्रहाची, अहिंसक आंदोलनाची होती. लोकांना अहिंसेचा, सत्याचा मार्ग दाखवणारा नेताच राहिला नाही. गुजरातेत हिंदुत्ववादी मंडळींनी याचा फायदा घेतला. लोकांमध्ये धार्मिक भेदभावाची जाणीव निर्माण केली. ‘आपण’ आणि ‘ते’ असा भेद वाढीस नेला. आपला धर्म धोक्यात आहे, या तणावाला हिंसा हेच उत्तर आहे, हे लोकांच्या मनावर बिंबवलं. गुजरातमध्ये गांधी विचारांचा पराभव झाला, असं मी म्हणणार नाही. कारण गांधी विचार पुढं चालू ठेवणारी माणसं निर्माण झाली नाहीत, जी सक्रिय होती ती संख्येनं कमी होती. म्हणून आजच्या परिस्थितीत अॅक्टिव्हिस्ट गांधींना समाजात परत आणण्याची गरज निर्माण झाली आहे, असे तुषार म्हणाले.

तुषार गांधी यांच्याशी खास बातचीत

गोडसेचे उद्दातीकरण करताना गांधीवादाचा प्रतिवाद करणं अशक्य

खोटा इतिहास सांगून रक्ताचे डाग पुसून टाकण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे. गांधी खटल्यात जे कोणी आरोपी होते त्या सर्वांचेच प्रेरणास्थान उजव्या विचारधारेची मंडळी होती. नंतर ती केस कमकुवत केली गेली. काँग्रेसमध्ये त्यावेळी अनेक हिंदुत्ववादी मंडळी होती. या प्रकरणात सावरकर सुटले. पण त्यांच्यावरचा डाग कायम राहिला. आता तो पुसण्याचा प्रयत्न चालू आहे. तो अर्थहीन आहे. काळाच्या कसोटीत हा खोटा प्रचार उखडून पडेल. सत्य नेहमीच उजळून निघते. गोडसेचे उद्दातिकरण करताना गांधीवादाचा प्रतिवाद तरी करणं त्यांना शक्य झालयं का? हा माझा प्रश्न आहे. मी लहानपणी पाहिलेला राम शितल होता. आज आक्रमक राम दाखवला जातो, असे ही ते यावेळी म्हणाले.

तुषार गांधी यांच्याशी खास बातचीत

देशाच्या इतिहासात विकृतीकरण संसदेपर्यंत पोहोचले

काँग्रेसच्या विरोधातील लोक म्हणजे काँग्रेसच्याच विकृतीचं प्रतिबिंब आहे. आरएसएस वर कुठलाही आपण आक्षेप घेतला, की ते लोक काँग्रेसच्या चुकांचा संदर्भ देतात. आपण गुजरात दंगलीचा विषय मांडला, की ते शीख दंगलीबद्दल बोलतात. काँग्रेसनेही चुका केल्यात. नंतर त्यांनी माफी मागितली, पण त्यांच्या कृतीतून चुकांची दुरुस्ती दिसून आली नाही. स्वातंत्र्यानंतरच्या ३० वर्षांत कुणी वेगळ्या पर्यायाचा विचार करत नव्हतं. अन् आता गेल्या १० वर्षांत काँग्रेस हा पर्याय हवा असं कुणालाही वाटत नाही. काँग्रेसमध्ये विरुद्ध विचारांचे लोक होते. स्वातंत्र्यानंतर ते एक विचारांनी टिकू शकलेच नसते, असे ही तुषार यावेळी म्हटले.

तुषार गांधी यांच्याशी खास बातचीत

सत्ताधारी मंडळी गांधीजींची प्रतिमा एका साच्यात बंदिस्त करुन ठेवतायेत

सत्ताधारी गांधींना हायजॅक करतात, कारण त्यांच्याकडे कोणी महापुरूषच नाही. त्यांना ठाऊक आहे, आपल्या महापुरुषांची नावं घेतल्यावर जगात आपल्याला कोणीही विचारणार नाही. त्यांच्यापैकी काहीजण पंडित दीनदयाळ, श्यामाप्रसाद यांचा उदो-उदो करतात. पण लोकांना त्यांच्याबद्दल चार ओळी तरी माहिती आहेत का? असे मत तुषार यांनी मांडले.

गांधींजी रोजच्या वागण्या-बोलण्यात आहेत

गांधीजींची आपण १५० वी जयंती साजरी करतोय, पण ही जयंती साजरी करणाऱ्यांमध्ये अजिबात एकता नाही. गांधीवाद म्हणजे काय हे युवकांपर्यंत योग्यरित्या पोहचलेले नाही. आज कार्यकर्ता गांधी तुमच्यापर्यंत पोहोचविण्याची खूप गरज आहे. गांधी पुस्तकात, पोषखात, भाषणात नाही, तर तो रोजच्या वागण्या-बोलण्यात आहे. परिस्थितीला उत्तर देण्यात आहे. सत्याग्रह करणारा माणूस आज एखादाच दिसतो. समाजासाठी रस्त्यावर येऊन लढतो, प्रश्न सोडवतो तोच गांधीवादी होय.

तुषार गांधी यांच्याशी खास बातचीत

अहिंसा हे काही तत्कालीन औषध नव्हे ते चिरकालीन टिकणारे मूल्य

मुळात त्यांनी हे घडूच दिलं नसतं. सर्व समाजातल्या ऐक्यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील होते. गांधी हे घटना घडल्यानंतर काही करणाऱ्यांपैकी नव्हते, तर ते घटना घडूच नये म्हणून काळजी घेणाऱ्यांपैंकी होते. त्यांची अहिंसा हे काही तत्कालीन औषध नाही. ते चिरकालीन मूल्य आहे. ते आज असते, तर आजही ते सामाजिक ऐक्याचं बीजारोपण करत राहिले असते. कार्यकर्त्याचं आयुष्य जगत असले असते.

गांधी व्यक्ती नव्हे विचार

गांधीजींचे विचार समजावून घेताना तरुणांना काय करणे गरजेचे आहे, हे सांगताना तुषार यांनी सांगितले, की तुम्हाला गांधी कोणीही शिकवू शकणार नाही. माझ्या अनुभवातून सांगतो, आपण गांधींना स्वत:च समजून घ्यावे लागणार आहे. गांधी ही व्यक्ती नाही, तो विचार आहे. तो समजून घेण्याची प्रेरणा आतून यायला हवी. दुसऱ्यानं कुणी काही सांगण्यापेक्षा आपल्या जीवनात आपण गांधी विचार घेऊन आजच्या परिस्थितीनुरुप छोटे छोटे प्रयत्न केले, तर आपण गांधी समजून घेऊ शकू. बापू नेहमी म्हणायचे, ‘मला आत्म्याचा आवाज ऐकू येतोय.’ तसं आपल्यालाही आपल्या स्वत:च डोकं चालवावं लागेल. ही खूप दीर्घ प्रक्रिया आहे. आपण अनुभवातूनच ते शिकू शकू. एका वेळी संपूर्ण गांधी समजून घेणंही खूप कठीण आहे. ती समजून घेण्याची प्रक्रिया सतत चालत राहते. त्यासाठी आपण आपल्या कृतीतून साद घालावी लागते.

Intro:Body:mh_mum_01_gandhi150__tushar_gandhi_121hindi_english_script_7204684

3G live 07 वरुन फिड पाठवले आहे.cameraman anil nirmal
Tushargandhi 121

गांधी ही व्यक्ती नव्हे, ताे विचार; तुषार गांधी

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीचे हे वर्ष आहे. गांधी विचारांचे देशविदेशांतील अभ्यासक, संबंधित उपक्रम, गांधीजींच्या विचारांचे समकालीन महत्त्व, आजच्या गांधी कुटुंबीयांचे कार्य, गांधीजींची 'स्वच्छाग्रही' म्हणून बनविण्यात येत असणारी प्रतिमा,काश्मिरातील कलम ३७० दुरुस्ती चा हुकुमशाही वापर आणि आजची आव्हाने आणि गांधी विचारांना घेऊन पुढं कसं जायचं, या आणि अशा अनेक पैलूंवर गांधी विचारांचे अभ्यासक आणि गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांच्याशी ईटिव्ही भारतचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी साधलेला संवाद..….

प्रश्न - गांधीजींचा अभ्यास भारतासह जगभरात केला जाताे. गांधी विचारांतून आजच्या समस्येला उत्तरंही शाेधली जातात. जगात गांधीविचारांचा अभ्यास केला जाताे, आणि त्यानुसार नवे प्रयाेगही केले जातात.?

उत्तर - आपल्याकडं पाहिलं तर एखाद्या महापुरूषाच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला जाताे. मग ताे काेणताही महापुरूष असाे. आपण त्या व्यक्तीच्या अस्मितेला कुरवाळत बसताे. विदेशात मात्र व्यक्तित्वाच्या पलीकडं जाऊन अभ्यास केला जाताे. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा, कार्यशैलीचा, तसंच समकालीन प्रश्नांच्या साेडवणुकीसाठी त्या विचारांचा आज उपयाेग किती, असं त्या अभ्यासाचं स्वरूप असतं. गांधी विचारांच्या बाबतीत पाश्चात्य राष्ट्रातील लाेक असाच अभ्यास करतात. अमेरिकनांनी गांधीजींच्या विचारांचं केलेलं अनुकरण आहे. बापुंच्या स्वदेशी या संकल्पनेतला हा आशय आहे. ते लाेक संख्येनं कमी आहेत, पण ते आपल्या कृतीवर खूष आहेत. अॅकॅडेमिक अभ्यासापेक्षा मला ही ठिकाणं खूप महत्त्वाची वाटतात.

 गांधीविचारांवर वेगवेगळ्या अॅंगल्सनी अभ्यास करून अनेकांनी डाॅक्टरेट, पाेस्ट डाॅक्टरेट मिळवलीय. उदाहरणार्थ सुटाबुटातील गांधी ते पंचा नेसणारे गांधी हा त्यांचा पाेषाखातील बदल कसा झाला, यामागं त्यांचं तत्त्वज्ञान काय हाेतं, याचासुद्धा अभ्यास केला गेलाय.वसुधैव कुटुंबमची संकल्पना जगभर स्विकारली जातीय. अमेरिका, कॅनडा, युराेपातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये असा अभ्यास हाेताना दिसताे. नीतिशास्त्राचा अभ्यास करताना गांधीविचारांशिवाय ताे हाेतच नाही. सत्य, अहिंसा आणि बंधुभावाचा एकच विचार सर्वांना एकत्र घेऊन जाणारा आहे.

प्रश्न- असे काेणते जागतिक नेते तुमच्या पाहण्यात आहेत का, की जे गांधीजींच्या विचार आणि एकूणच अहिंसक विचारांकडं सकारात्मक दृष्टीने पाहतात?  

उत्तर - जागतिक स्तरावर गांधीजींचा आणि एकूणच अहिंसेचा विचार काेण किती मांडतंय यापेक्षा मला ते त्या विचारांचं आचरण किती आणि कसं करताहेत, हे महत्त्वाचं वाटतं. आेबामा भाषणांतून मार्टिन ल्युथर, मंडेला, गांधी यांचं नाव घ्यायचे, पण त्यांच्या आचरणात ते दिसून येत नव्हतं. क्षमा सिद्धांतही कुठे दिसला नाही. आज बाेलणारे पुष्कळ प्रमुख लाेक दिसतात, पण अहिंसेच्या मार्गावरून खरंच चाललाय असा आचरण करणारा राष्ट्रप्रमुख दिसत नाही. महायुध्दानंतर आणखी काही विध्वंस होईल असं वाटलं नव्हतं. परंतू आता जवळपास वळून पाहीलं तर विध्वस्थ दिसतो. आपले पंतप्रधान तर गांधीजींचं सतत नाव घेतात. पण प्रत्यक्ष कृती वेगळीच असते.

प्रश्न - जागतिक नेत्यांबद्दल तुमचा अनुभव सांगितला तसा तरूण पिढीबद्दलचा तुमचा काय अनुभव आहे, तुम्हाला देशविदेशांतील तरूणतरूणी गांधीबद्दल विचारत असतात, ते गांधीजींचा नेमका काेणता पैलू तुमच्याकडून जाणून घेऊ असतात?

उत्तर- जास्त करून त्यांचे प्रश्न आजच्या समस्यांबद्दल असतात. आजच्या आमच्या समस्येला गांधीविचारांतून उत्तर कसे मिळेल. हे ते जाणून घेऊ इछितात. किंवा आजच्या इकाॅनाॅमिक थिअरीमध्ये गांधी कसे उपयाेगी पडू शकतात, यबद्दल विचारत असतात. काॅंफ्लिक्ट रेस्झुलेशनच्या संदर्भात जेव्हा ते गांधीजींच्या तत्वज्ञानाला तपासून पाहतात, तेव्हा उत्तर मिळतं की गांधीजींचं तत्त्वज्ञान हे काॅंफ्लिक्टनंतर उत्तर देणारं नाही, तर काॅंफ्लिक्ट निर्माणच हाेऊ नये याची काळजी घेणारं आहे. सिंप्लिसिटी इन इंजिनिअरिंग डिझाईन मध्ये गांधीविचार कसा महत्त्वाचा ठरू शकताे, हे जाणून घेणारे तरूण तरूणी मला भेटतात. तशी निर्मितीही ते करताना दिसतात. मला त्याच खूप काैतुक वाटतं कारण ताे गांधीविचारांना आचरणात आणणारा हा प्रयाेग आहे.

प्रश्न - पर्यावरणाबद्दल कधी विचारतात?
उत्तर - हाे, तरूण मुलंमुली आणि प्राैढही गांधींच्या पर्यावरणीय विचारांना जाणून घेतात. शाश्वत विकासाची व्याख्याच अशी आहे. केवळ शाश्वत नव्हे तर नैतिकदृष्ट्या गांधींनी विकासाबद्दल विचार मांडले हाेते. ते विचार लाेक आज समजून घेऊ इच्छितात. विदेशांत पर्यावरणविषयक काेर्सेसची जी निर्मिती केली आहे, त्यात गांधीजींचं नाव कुठेही दिसणार नाही, पण जी काेअर आयडिया आहे ती मात्र गांधीजींची दिसेल. अभ्यासकही गांधींचा संदर्भ घेताना दिसतात.

प्रश्न -आज बहुतांश राष्ट्रांत सत्तेवर येणारी मंडळी ही उजव्या आणि आक्रमक विचारांची आहेत. ते पर्यावरणापासून ते मानवी हक्कांपर्यंत उलट भूमिका घेताना दिसतात. या सगळ्यांकडं तुम्ही कसं पाहता?

उत्तर- संस्कृतीचं एक चक्र असतं. कधी एक टाेक पुढं येतं तर कधी दुसरं येतं. एकच टाेक कायम राहील असं अजिबात नसतं. लाेकांच्या भावनांशी खेळून, राजकारण साधून ते सत्तेत येतात, पण ते दीर्घकाळ सत्तेत टिकू शकतील असं मला अजिबात वाटत नाहीत. ते शाश्वत अजिबात नाहीत. ह्युमन नेचर सहिष्णू आहे. ही सहिष्णुताच कायम टिकू शकते. उग्रवाद हा तत्त्कालीन आहे, ताे निश्चित संपताे. हिटलरचं, इंग्लंडचं एकेकाळी दृष्ट साम्राज्य हाेतं, पण तेही मावळलं. मला असं वाटतं की सद्ध्या ही एक फेज आहे. ती निघून जाणारय, पण म्हणून आपण हातात हात घालून बसणं याेग्य हाेणार नाही. आपल्याला त्याला विराेध करावाच लागेल. कार्यरत व्हावंच लागेल. उग्रवादाकडं आपण काही साेपेपणानं जात नाही. भारतात बघा,
माेदींनी सुद्धा पंतप्रधान झाल्यावर गांधीजींचं नाव घ्यायला लागलं. त्यांना ठाऊक आहे की, मी जर गांधीजींचं नाव घेतलं नाही, तर लाेक मला स्वीकारणार नाहीत. मला सांगायचंय हे की आपली नैसर्गिक प्रकृती ही सहिष्णू आह. असहिष्णुता ही आपल्याला कृत्रिमपणे आणावी लागते. ती जगात टीकू शकणार नाही. पण जर समाजात असहिष्णुवृत्ती असतील तर त्यांच्याविराेधात आपल्याला सक्रीय राहायला हवं.

प्रश्न- गांधीजींचं मूळ गुजरात राज्यात आहे. दांडी यात्रा, गांधीजींचे आश्रम, तिथले सत्याग्रह, गुजरात विद्यापीठ इतकं सगळं गुजरात मध्ये असताना, जातीय दंग्यांचं, विभाजनाचं ठिकाणही गुजरातंच झालं. हा बदल कसा काय हाेत गेला, लाेकही कसे बदलले?

उत्तर- लाेक बदलले नाहीत, तर लाेकांना बदलवलं गेलं. बापुंनी पण लाेकांना बदलवलंच हाेतं. नाहीतर त्यापूर्वी लाेक उदासिन हाेते. केवळ गुजरातच नव्हे तर सारा देश उदासिन हाेता. त्यांना विधायक वळण देण्याचं काम बापुंनी केलं. आपल्या कुवतीनुसार आपण स्वातंत्र्याचा लढा लढू शकताे, हे त्यांनी लाेकां मनावर बिंबवलं. लाेक सत्याग्रहात सामील झाले. गांधींनंतर एक पिढी साेडली तर देशात पाेकळी निर्माण झाली. ही पाेकळी सहिष्णुतेची, सत्याग्रहाची, अहिंसक आंदाेलनाची हाेती. लाेकांना अहिंसेचा, सत्याचा मार्ग दाखवणारा नेताच राहिला नाही. गुजरातेत हिंदुत्ववादी मंडळींनी याचा फायदा घेतला. लाेकांमध्ये धार्मिक भेदभावाची जाणीव निर्माण केली. ‘आपण’ आणि ‘ते’ असा भेद वाढीस नेला. आपला धर्म धाेक्यात आहे, या तणावाला हिंसा हेच उत्तर आहे, हे लाेकांच्या मनावर बिंबवलं.
गुजरातेत गांधीविचारांचा पराभव झाला असं मी म्हणणार नाही. कारण गांधी विचार पुढं चालू ठेवणारी माणसं निर्माण झाली नाहीत, जी सक्रीय हाेती ती संख्येनं कमी हाेती. म्हणून आजच्या परिस्थितीत अॅक्टिव्हिस्ट गांधींना समाजात परत आणण्याची गरज निर्माण झालीय.

प्रश्न - सध्या गांधीजींच्या हत्येला सावरकर जबाबदार नाहीत अशी मांडणी हाेतेय. नथूराम गोडसेंचं उद्दातीकरण करणारे विचार पुढं येत आहेत. एक अभ्यासक म्हणून काय सांगाल तुम्ही याबद्दल?

उत्तर- छोटा इतिहास सांगून रक्ताचे डाग पुसून टाकण्याचा आता प्रयत्न सध्या चालू आहे. गांधी खटल्यात जे काेणी आराेपी हाेते त्या सर्वांचेच प्रेरणास्थान उजव्या विचारधारेचे मंडळी हाेते. नंतर ती केस कमकुवत केली गेली. काॅंग्रेसमध्ये त्यावेळी अनेक हिंदुत्ववादी मंडळी हाेती. सावरकर सुटले. पण त्यांच्यावरचा डाग कायम राहिला. आता ताे पुसण्याचा प्रयत्न चालू आहे. ताे अर्थहीन आहे.काळाच्या कसोटीत हा खोटा प्रचार उखडून पडेल. सत्य नेहमीच उजळून निघते. गोडसेचे उद्दातिकरण करताना गांधीवादाचा प्रतिवाद तरी करणं त्यांना शक्य झालयं का हा माझा प्रश्न आहे.मी लहानपणी पाहीलेला राम शितल होता. आज आक्रमक राम दाखवला जातो.

प्रश्न - देशाच्या अर्वाचिन इतिहासात विकृतीकरण होत असून महामानवांचा इतिहासाचे विकृतीकरण संसदेपर्यंत पोचले आहे. या ऐतिहासिक आक्रमकतेला कसे थाेपवू शकतो?  

उत्तर- ते त्या आक्रमकतेचा मुकाबला करू शकतील असं आज तरी वाटत नाही. काॅंग्रेसच्या विराेधातील लाेक म्हणजे काॅंग्रेसच्याच विकृतीचं प्रतिबिंब आहे. आरएसएस वर कुठलाही आपण आक्षेप घेतला की ते लाेक काॅंग्रेसच्या चुकांचा संदर्भ देतात. आपण गुजरात दंगलीचा विषय मांडला की ते शिख दंगलीबद्दल बाेलतात. काॅंग्रेसनेही चुका केल्यात. नंतर त्यांनी माफी मागीतली, पण त्यांच्या कृतीतून चुकांची दुरूस्ती दिसून आली नाही. स्वातंत्र्यानंतरच्या तीस वर्षांत कुणी वेगळ्या पर्यायाचा विचार करत नव्हतं. अन आता गेल्या दहा वर्षांत काॅंग्रेस हा पर्याय हवा असं कुणालाही वाटत नाही. काॅंग्रेसमध्ये विरूद्ध विचारांचे लाेक हाेते. स्वातंत्र्यानंतर ते एकविचारांनी टिकू शकलेच नसते.

प्रश्न- सत्ताधारी मंडळी गांधीजींची प्रतिमा एका साच्यात बंदिस्त करून ठेवताहेत. हिंदू मुस्लीम एेक्यासाठी झगडणारे ‘सत्याग्रही’ गांधी लपवून केवळ स्वच्छतेचा संदेश देणारे ‘स्वच्छाग्रही’ गांधी पुढं आणताहेत. गांधीवादी मंडळींनी याला थाेपवायचं कसं ?

उत्तर- हे आव्हानात्मक आहे, पण याला थाेपवता येऊ शकतं. आपल्याला वर्तमानातल्या समस्यांना घेऊन रस्त्यावर उतरायला हवं. गांधींच्या विचारांतून आपण आजच्या समस्यांना उत्तर द्यायला हवं. आपण जितके गप्प राहू तितके ते गांधींना आणखी हायजॅक करतील. ते गांधींना का हायजॅक करतात, कारण त्यांच्याकडे काेणी महापुरूषच नाही. त्यांना ठाऊक आहे, आपल्या महापुरूषांची नावं घेतल्यावर जगात आपल्याला काेणीही विचारणार नाही. त्यांच्यापैकी काहीजण पंडित दीनदयाळ, श्यामाप्रसाद यांचा उदाेउदाे करतात. पण लाेकांना त्यांच्याबद्दल चार आेळी तरी माहिती आहेत का? 

आता हेच पहा, गांधीजींची दिडशेवी जयंती आपण साजरी करताेय, पण साजरी करणाऱ्यांमध्ये अजिबात एकता नाही. गांधीवाद म्हणजे काय हे तुम्हा युवकांपर्यंत निटसं पाेहाेचलं नाही. आज अॅक्टिव्हिस्ट गांधी तुमच्यापर्यंत पाेहाेचविण्याची खूप गरज आहे. गांधी पुस्तकात, पाेषखात, भाषणात नाही, तर ताे राेजच्या वागण्याबाेलण्यात आहे. परिस्थितीला उत्तर देण्यात आहे. सत्याग्रह करणारा माणूस आज एखादाच दिसताे. समाजासाठी रस्त्यावर येऊन जाे लढताे, प्रश्न साेडवताे ताेच गांधीवादी.

प्रश्न: काश्मीर मधे कलम ३७० रद्द करण्याच्या प्रक्रियेवर काय सांगाल?
उत्तर:कलम ३७० रद्द करण्याच्या प्रकियेत लोकशाहीची गळचेपी केली जात असतानाही कोणताही आवाज त्याविरोधात उठलेला जात नाही हे दुदैव आहे. कश्मीरचा हा भारताचा अविभाज्य भाग आहे हा इतिहास आहे.राजा हरिसिंहने केलेला करार इतिहास आहे. नेहरु पटेलांच्या त्यावेळच्या भुमिकांची विकृती करुन लोकशाही पायदळी तुडवली जातेय. ३७० नव्हे तर अलिकडं संसदेत मंजूर होणाऱ्या कायद्यांवर चर्चा होत नाही हे दुर्देव आहे. काश्मीरची जनता भारतीय असेल तर त्यांना विश्वासात का घेतले नाही? आजही तिथली परिस्थिति सामान्य नाही. मग उद्याचे चित्र कसे असेला हा प्रश्न कायम आहे.

प्रश्न- आज बापू असते तर दिडशे वर्षांचे असले असते. बाबरी मशिद, गुजरात दंगल या प्रसंगी आणि आजच्या काळात त्यांची काय भूमिका राहिली असती ?

उत्तर- मुळात त्यांनी हे घडूच दिलं नसतं. सर्व समाजातल्या एेक्यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील हाेते. गांधी हे घटना घडल्यानंतर काही करणाऱ्यांपैकी नव्हते, तर ते घटना घडूच नये म्हणून काळजी घेणाऱ्यांपैंकी हाेते. त्यांची अहिंसा हे काही तत्कालीन आैषध नाही. ते चिरकालीन मूल्य आहे. ते आज असते, तर आजही ते सामाजिक एेक्याचं बीजाराेपण करत राहिले असते. कार्यकर्त्याचं आयुष्य जगत असले असते.  
प्रश्न- नव्या पिढीला गांधीविचार घेऊन पुढं जायचंय. तुमच्या अनुभवाचं सार म्हणून काय सांगाल आम्हाला? 

उत्तर- माझं एकच उत्तर आहे. तुम्हाला गांधी काेणीही शिकवू शकणार नाही. माझ्या अनुभवातून सांगताे, आपण गांधी स्वत:च समजून घ्यावा लागणार आहे. गांधी ही व्यक्ती नाही, ताे विचार आहे. ताे समजून घेण्याची प्रेरणा आतून यायला हवी. दुसऱ्यानं कुणी काही सांगण्यापेक्षा आपल्या जीवनात आपण गांधी विचार घेऊन आजच्या परिस्थितीनुरूप छाेटे छाेटे प्रयत्न केले, तर आपण गांधी समजून घेऊ शकू. बापू नेहमी म्हणायचे, ‘मला आत्म्याचा आवाज एेकू येताेय.’ तसं आपल्यालाही आपल्या स्वत:त डाेकवावं लागेल. ही खूप दीर्घ प्रक्रिया आहे. आपण अनुभवातूनच ते शिकू शकू. एका वेळी संपूर्ण गांधी समजून घेणंही खूप कठीण आहे. ती समजून घेण्याची प्रक्रीया सतत चालत राहते. त्यासाठीआपण आपल्या कृतितून साद घालावी लागते.

- तुषार गांधी
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक व
अध्यक्ष, महात्मा गांधी फाउंडेशन

Conclusion:
Last Updated : Aug 23, 2019, 8:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.