ETV Bharat / city

Omicron : परदेशातून मुंबईत आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशांची संख्या 23 वर

author img

By

Published : Dec 7, 2021, 10:11 PM IST

आतापर्यंत मुंबईत 4845 परदेशी प्रवासी (International Travellers) आले असून त्यापैकी 23 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्व प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या सहवासातील लोकांचा शोध घेतला जात आहे.

omicron
कोरोना फाईल फोटो
  • मुंबई - कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन (Omicron Variant) या नवीन व्हेरियंटच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसात मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) आलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्या कोरोना चाचण्या (Corona Test) केल्या जात आहेत. आतापर्यंत मुंबईत 4845 परदेशी प्रवासी (International Travellers) आले असून त्यापैकी 23 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्व प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या सहवासातील लोकांचा शोध घेतला जात आहे.
  • 23 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह -

कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार सुरू झाल्याने मुंबई विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. 10 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान हाय रिस्क देशातून 4845 प्रवासी मुंबईमध्ये आले आहेत. या सर्वांचा शोध घेण्याचे व चाचण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 23 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात 19 पुरुष तर 4 महिला प्रवासी आहे. या पॉझिटिव्ह प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. या सर्व पॉझिटिव्ह प्रवासी रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांचे नमुने जिनोम सिक्वेनसिंग तसेच एस जिन चाचणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.

  • परदेशी प्रवाशांच्या चाचण्या -

दक्षिण आफ्रिकेसह काही देशात कोरोना विषाणूचा ओमायक्रोन हा व्हेरियंट समोर आला आहे. या विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असल्याने केंद्र सरकारने देशात येणाऱ्या परदेशी प्रवाशांच्या चाचण्या करण्याच्या तसेच त्यांना क्वारेंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मुंबई विमानतळावर नोव्हेंबरपासून आलेल्या आलेल्या परदेशी प्रवाशांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या विभागवार असलेल्या वॉर रूममधून या प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. या प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत असून जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत त्यांना क्वारेटाईन केले जात आहे. तसेच त्यांची जिनोम सिक्वेनसिंग व एस जिन चाचण्या केल्या जात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.