ETV Bharat / city

MP Navneet Rana : नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र प्रकरणात अंतरिम दिलासा; 18 ऑक्टोंबर रोजी अर्जाची सुनावणी - जात प्रमाणपत्र प्रकरणात अंतरिम दिलासा

बोगस जात प्रमाणपत्राच्या ( Bogus caste certificate ) मुद्द्यावरून प्रकरणात अडकलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. पी एम एल ए कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे ( PMLA Court Judge Rahul Rokde ) यांनी नवनीत राणा यांना अंतरिम दिलासा देत कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश मुलुंड पोलिसांना (Mulund Police ) दिले आहे.

MP Navneet Rana
नवनीत राणा
author img

By

Published : Oct 11, 2022, 7:43 AM IST

मुंबई : बोगस जात प्रमाणपत्राच्या ( Bogus caste certificate ) मुद्द्यावरून प्रकरणात अडकलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. या प्रकरणी अटकेची टांगती तलवार असतानाच मूळ तक्रारदार जयंत वंजारी ( Original Complainant Jayant Vanjari ) यांनीही सत्र न्यायालयात धाव घेत राणा यांच्या अर्जाला आक्षेप घेतला आहे. अर्जाची दखल घेत न्यायालयाने सुनावणी 18 ऑक्टोबर रोजी निश्चित केली आहे.

जात प्रमाणपत्र मिळवून फसवणूक : अमरावतीमध्ये नवनीत राणा ज्या जागेवरून निवडून आल्या ती जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित होती. परंतु राणा यांनी त्या अनुसूचित जातीतील असल्याचा दावा केला होता आणि निवडणूक लढवली होती. मात्र शाळा सोडल्याच्या खोटया दाखल्याच्या आधारे त्यांनी जात प्रमाणपत्र मिळवून फसवणूक केल्याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी राणा आणि त्यांचे वडील हरभजन सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

अर्जाची सुनावणी 18 ऑक्टोंबर रोजी : त्या अर्जावर सोमवारी विशेष सत्र न्यायाधीश आर. एन. रोकडे यांच्यापुढे सुनावणी झाली. मूळ तक्रारदार जयंत वंजारी यांच्या वतीने अ‍ॅड. सचिन थोरात यांनी राणांच्या याचिकेला विरोध करत आपला अर्ज दाखल केला. राणा व त्यांच्या वडिलांच्या अपिलावर कुठलाही निर्णय देण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घ्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. तर मुलुंड पोलीसांकडून भूमिका स्पष्ट करण्यासाठी वेळ मागण्यात आला. त्याची दखल घेत न्यायालयाने अर्जाची सुनावणी 18 ऑक्टोंबर रोजी सुनावणी निश्चित केली.

अंतरिम दिलासा देत कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश : शिवडी न्यायालयाच्या अजामीनपात्र वॉरंट विरोधात सत्र न्यायालयामध्ये पुनर्विचार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी नवनीत राणा यांना अंतरिम दिलासा देत कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश मुलुंड पोलिसांना दिले आहे. जात प्रमाणपत्र प्रकरणात खासदार नवनीत राणा उर्फ ​​नवनीत कौर हरभजन सिंग कुंडेल आणि वडील हरभजन सिंग रामसिंग कुंडलेस यांच्या विरोधात मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा खोटा दाखला केल्याचा आरोप : खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात कलम 420, 468, 471 आणि 34 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवनीत आणि हरभजन सिंग रामसिंग कुंडलेशिवाय तिचे वडील देखील या प्रकरणात आरोपी आहे. नवनीत राणा यांच्यावर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला खोटा केल्याचा आरोप आहे. अमरावती मतदार संघ अनुसूचित जाती उमेदवारांसाठी राखीव आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात राणा उर्फ ​​नवनीत कौर हरभजन सिंग कुंडलेस आणि तिचे वडील हरभजन सिंग रामसिंग कुंडलेस यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.