ETV Bharat / city

राज्याच्या माहिती जनसंपर्क विभागात अपुरे मनुष्यबळ - माहिती व जनसंपर्क विभाग महाराष्ट्र

सरकार आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करणाऱ्या, सरकारी योजनांची प्रसिद्धी, प्रचार करणाऱ्या राज्याच्या माहिती जनसंपर्क विभाग काम करते. या विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. महासंचालकाच्या अखत्यारीत मुंबईत संचालकांची पाच, तर विभागीय पातळीवर उपसंचालकांची सहा पदे आहेत. मुंबईतील संचालक (प्रशासन) अजय आंबेकर यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. तर विभागीय उपसंचालकांपैकी अमरावती विभागाचे उपसंचालक राधाकृष्ण मुळी मे महिन्यात निवृत्त होणार आहेत.

mantralay
मंत्रालय
author img

By

Published : Mar 4, 2021, 12:05 PM IST

मुंबई - सरकारच्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवणाऱ्या राज्याच्या माहिती जनसंपर्क विभागात अपुरे मनुष्यबळ आहे. तरीही कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त भार सोपवून राज्याचा गाडा ओढला जात आहे.

सरकार आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करणाऱ्या, सरकारी योजनांची प्रसिद्धी, प्रचार करणाऱ्या राज्याच्या माहिती जनसंपर्क विभाग काम करते. या विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. महासंचालकाच्या अखत्यारीत मुंबईत संचालकांची पाच, तर विभागीय पातळीवर उपसंचालकांची सहा पदे आहेत. मुंबईतील संचालक (प्रशासन) अजय आंबेकर यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. तर विभागीय उपसंचालकांपैकी अमरावती विभागाचे उपसंचालक राधाकृष्ण मुळी मे महिन्यात निवृत्त होणार आहेत.

कोल्हापूर विभागाचे उपसंचालक अनिरुद्ध अष्टपुत्रे यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालयातील जनसंपर्क अधिकाऱ्याची जबाबदारी सोपवली आहे. पुणे आणि नाशिकमध्येही माहिती उपसंचालकांचे पद रिक्त आहे. चंद्रपूर आणि गोंदियामध्ये जिल्हा माहिती अधिकारी पद रिक्त झाले आहे. चंद्रपूरचा अतिरिक्त कार्यभार वर्धा जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडे, तर गोंदियाचा अतिरिक्त कार्यभार भंडारा जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. जिल्हापातळीवरही वर्ग -२ आणि वर्ग-३ ची साधारणपणे निम्मी पदे रिक्त आहेत. जनसंपर्क विभागात दैनंदिन कामकाजाचा व्याप असतो. रिक्त पदांची भरती करण्याऐवजी सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो आहे. राज्य शासनाने इतर काही विभागांच्या भरती प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. याच धर्तीवर या खात्यात पदभरतीची प्रक्रिया तातडीने राबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सर्वच विभागांत रिक्त पदे आहेत. ती भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी महिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.