ETV Bharat / city

Malegaon Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील दुचाकीची न्यायालयाकडून पाहणी

मालेगावसह संपूर्ण महाराष्ट्र (29 सप्टेंबर 2008)रोजी हादरला होता. मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. तर, 100 हून अधिक जखमी झाले होते. या संदर्भातील नियमीत सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात विशेष एनआयए कोर्टामध्ये सुरू आहे. ( Malegaon Blast Case ) मालेगावमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी वापरण्यात आलेली मोटर सायकलसह आज मंगळवार (2 ऑगस्ट)रोजी कोर्टासमोर आणण्यात आल्या होत्या. या सर्व पुराव्याची पाहणी न्यायमूर्ती ए. के लाहोटी यांच्यासह आरोपींचे वकील आणि आरोपी यांनी देखील केली. या याचिकेवर पुढील सुनावणी उद्या (3 ऑगस्ट)रोजी होणार आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील दुचाकीची न्यायालयाकडून पाहणी

author img

By

Published : Aug 2, 2022, 8:25 PM IST

मुंबई - मालेगावसह संपूर्ण महाराष्ट्र (29 सप्टेंबर 2008)रोजी हादरला होता. मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. तर, 100 हून अधिक जखमी झाले होते. या संदर्भातील नियमीत सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात विशेष एनआयए कोर्टामध्ये सुरू आहे. मालेगावमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी वापरण्यात आलेली मोटर सायकलसह आज मंगळवार (2 ऑगस्ट)रोजी कोर्टासमोर आणण्यात आल्या होत्या. या सर्व पुराव्याची पाहणी न्यायमूर्ती ए. के लाहोटी यांच्यासह आरोपींचे वकील आणि आरोपी यांनी देखील केली. या याचिकेवर पुढील सुनावणी उद्या (3 ऑगस्ट)रोजी होणार आहे.

बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला - मालेगाव (2008)च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आजचा दिवस महत्त्वाचा आहे. स्फोट घडवण्यासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल मंगळवारी न्यायालयात आणण्यात आली असून, त्यासोबत आणखी एक युनिकॉर्न मोटारसायकल आणि 5 सायकलीही जप्त करण्यात आल्या आहेत. कोर्ट कंपाऊंडच्या तळमजल्यावर एनआयएचे वकील आणि आरोपीचे वकील स्वत: न्यायमूर्ती ए. के लाहोटी यांच्यासह एनआयएचे साक्षीदार आणि वकील वाहनाची तपासणी करण्यासाठी कोर्टाच्या आवारात आले. फॉरेन्सिक तज्ज्ञ, साक्षीदार तपासले. स्फोटासाठी वापरण्यात आलेली एलएमएल फ्रीडम मोटारसायकल साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या नावाची होती. हे विशेष, साध्वी प्रकरणात आरोपी क्रमांक एक आहे. (29 सप्टेंबर 2008)रोजी झालेल्या या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर, 100 जण जखमी झाले होते.

प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याचे आदेश - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एकूण 424 साक्षीदार आहे त्यापैकी आतापर्यंत 256 साक्षीदारांचा जबाब मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल न्यायालयामध्ये नोंदवण्यात आला आहे तर आतापर्यंत 23 साक्षीदारांना फितूर म्हणून न्यायालयाने घोषित केले आहे सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याचे आदेश देखील उच्च न्यायालयाला देण्यात आले होते त्यानंतर या प्रकरणात तील आरोपी समीर कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात देखील याचिका दाखल केली आहे.

खटला चालवण्यालायक कोणताही ठोस पुरावा नसल्याचा दावा - विशेष म्हणजे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएने 31 मे 2016 रोजी नवीन आरोपपत्र दाखल केले होते. त्यात रमेश शिवाजी उपाध्याय, समीर शरद कुलकर्णी, अजय राहिरकर, राकेश धावडे, जगदीश महात्रे, कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, सुधाकर द्विवेदी उर्फ ​​स्वामी दयानंद पांडे, सुधाकर चतुर्वेदी, रामचंद्र कलसांगरा आणि संदीप दांगे यांच्याविरुद्ध सबळ पुरावे असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, शिव नारायण कलसांगरा, श्याम भंवरलाल साहू, प्रवीण टक्कल्की, लोकेश शर्मा, धनसिंग चौधरी यांच्याविरुद्ध खटला चालवण्यालायक कोणताही ठोस पुरावा नसल्याचा दावा करण्यात आला.

काय आहे प्रकरण - 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर या या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय रहीरकर आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.

हेही वाचा - Desai Comment On Raut: संजय राऊतांनी आपल्या चुकांचे खापर राजकीय पक्षावर फोडू नये -शंभूराज देसाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.