मुंबई: अविनाश भोसले यांना न्यायालयासमोर हजर केले असता ईडी पुन्हा कोठडीचे मागणी करण्यात आली होती मात्र अविनाश भोसले यांच्या वकिलांकडून कोर्टात सांगण्यात आले की यापूर्वी देखील आतापर्यंत 12 दिवसाची कोठडी घेतलेली आहे माझ्या क्लाइंट कडे असलेली सर्व माहिती ईडीला देण्यात आली आहे त्यामुळे त्यांना आता पुन्हा कोठडी देण्यात येऊ नये तसेच त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली त्यानंतर न्यायालयाने अविनाश भोसले यांची 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणातील अविनाश भोसले यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल करत अटक अटक केली होती त्यानंतर या प्रकरणात ईडीने अविनाश भोसले यांचा ताबा घेतला होता. त्यानंतर त्यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात हजर करण्यात आले असता त्यावेळी ईडीकडून कोठडीची मागणी करण्यात आली होती. पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआय ने कडून अटक केली. डीएचएलएफ प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातूनच त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली.
गेल्या वर्षी जून 2021 मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. डीएचएलएफ घोटाळा प्रकरणानंतर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली. भोसले कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. रिअल इस्टेट किंग अशी त्यांची ओळख आहे. बांधकाम व्यवसायात आल्यानंतर सुरुवातीला कंत्राटदार ते आता पुण्यातील रिअल इस्टेट किंग अशी त्यांची ओळख आहे.