ETV Bharat / city

डॉ. आंबेडकर स्मारकाचा पायाभरणी समारंभ वादात; निमंत्रण न मिळाल्याने अनेक मंत्री नाराज - डॉ. आंबेडकर पायाभरणी समारंभ वादात

एमएमआरडीए आणि मुख्यमंत्री कार्यालयांमध्ये या कार्यक्रमासंदर्भात झालेल्या नियोजनाबाबत महाविकासआघाडीतील मंत्रीच अनभिज्ञ असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पायाभरणी आधीच महाविकास आघाडीतले मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. अनेकांना या कार्यक्रमाची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली नसल्याचे एका मंत्र्याने खासगीत बोलताना सांगितले. तसेच ज्या मंत्र्यांना आमंत्रण देण्यात आले त्यांना ऐनवेळी आमंत्रण देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Dr. Babasaheb Ambedkar Memorial
डॉ. आंबेडकर स्मारकाचा पायाभरणी समारंभ वादात; निमंत्रण न मिळाल्याने अनेक मंत्री नाराज
author img

By

Published : Sep 18, 2020, 10:08 AM IST

मुंबई : उभारणीच्या आधीपासून वादात सापडलेले इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर स्मारक पुन्हा एकदा वादात सापडले आहे. यावेळी निमित्त ठरले आहे, डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभाचे. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पाचा आराखडा बदलल्यानंतर, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुतळ्याचा पायाभरणी समारंभ आज आयोजित केला होता. यावरुनच महाविकासआघाडी अंतर्गत आणि आणि बाहेरुन नाराजी नाट्य उफाळून आले आहे.

हा कार्यक्रम मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने आयोजित केल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली होती. दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री भूमिपूजनासाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. रात्री उशीरा पुन्हा मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या वतीने हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सुरुवातीला पाठवलेली सगळी निमंत्रण पत्रे रद्द झाल्याचे कळवण्यात आले. कोविड प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने मुंबई शहरामध्ये कालच आयपीसी कलम 144अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळेच या कार्यक्रमावर बंधन आल्याचे सांगितले जात आहेत. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनीही निमंत्रण न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भूमिपूजन कार्यक्रमाआधी रिपब्लिकन सेना आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.

विशेष म्हणजे एमएमआरडीए आणि मुख्यमंत्री कार्यालयांमध्ये या कार्यक्रमासंदर्भात झालेल्या नियोजनाबाबत महाविकासआघाडीतील मंत्रीच अनभिज्ञ असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पायाभरणी आधीच महाविकास आघाडीतले मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. अनेकांना या कार्यक्रमाची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली नसल्याचे एका मंत्र्याने खासगीत बोलताना सांगितले. तसेच ज्या मंत्र्यांना आमंत्रण देण्यात आले त्यांना ऐनवेळी आमंत्रण देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुरुवातीपासून वादात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन 2016मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर या प्रकल्पाच्या मूळ आराखड्यात बदल करण्यात आले असून, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पायाभरणी समारंभ मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पाडला जाणार आहे. अंतर्गत आणि आणि बाहेरून नाराजी नाट्य सुरू असल्याने हा कार्यक्रम कसा पार पडणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : राज्य पोलीस प्रशासनामध्ये मोठे बदल, अमिताभ गुप्ता पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.