ETV Bharat / city

Coronavirus New Cases Today : देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्ण घटले, 13 हजार 734 नवीन कोरोनाबाधित

author img

By

Published : Aug 2, 2022, 10:06 AM IST

Coronavirus New Cases Today : देशात चार दिवसांच्या रुग्णवाढीनंतर कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. देशातील सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीबाबत जाणून घ्या.

Coronavirus New Cases Today
Coronavirus New Cases Today

मुंबई - गेल्या काही दिवसांमध्ये देशात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसामध्ये वाढत असलेला कोरोनाचा आलेख किंचित घटत आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली आहे. ( Coronavirus New Cases Today ) काल दिवसभरात देशात 13 हजार 734 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशात सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारांहून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

देशात 39 कोरोनाबाधितांचा मृत्यू - देशात सध्या एक लाख 43 हजार 989 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशात गेल्या 24 तासांत 39 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण 5 लाख 26 हजार 396 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहेत. रविवारी 16 हजार 112 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून 4 कोटी 33 लाख 65 हजार 890 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईत 322 नव्या रुग्णांची भर - मुंबईत 322 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी 236 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,03,261 वर पोहोचली आहे. ( Coronavirus New Cases Today ) त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 651 झाली आहे. सध्या मुंबईत 1,901 रुग्ण आहेत.

रुग्णसंख्या स्थिर - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून १६ जूनला २३६६, २३ जूनला २४७९, ३० जुनला १२६५ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १ जुलैला ९७८, २ जुलैला ८११, ३ जुलैला ७६१, ४ जुलैला ४३१,५ जुलैला ६५९, ६ जुलैला ६९५, ७ जुलैला ५४०, ८ जुलैला ५३०, ९ जुलैला ४९९, १० जुलैला ३९९, ११ जुलैला २३५, १२ जुलैला ४२०, १३ जुलैला ३८३, १४ जुलैला ३३९, १५ जुलैला ३६५, १६ जुलैला २८२, १७ जुलैला २७६, १८ जुलैला १६७, १९ जुलैला २८४, २० जुलैला २९०, २१ जुलैला २७३, २२ जुलैला २९९, २३ जुलैला २६६, २४ जुलैला २३८, २५ जुलैला १७६, २६ जुलैला २६३, २९ जुलैला २९०, ३० जुलै २८६ रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचा - Mumbai University : 'विद्यार्थी संघटना शाहू महाराजांचे नाव देण्यावर ठाम', कुलगुरूंनी घेतली भेट

हेही वाचा - Who is Al Zawahiri? लादेनचा सहकारी, अमेरिकेचा कट्टर शत्रू अल जवाहिरी कोण होता? जाणून घ्या..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.