ETV Bharat / city

बुलेट ट्रेन मार्गाकरता भारतात पहिला प्रयत्न, ठाण्याच्या खाडीखाली होणार भुयारी मार्ग, बोगद्यासाठी निविदा जाहीर - बोगद्यासाठी निविदा जाहीर

बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर लवकर धावण्यासाठी शासन आग्रही आहे (India first attempt for bullet train route). त्यासाठी भारतातील सर्वात पहिली समुद्राखालील भुयारी मार्गाची निविदा जाहीर केली आहे (NHSRCL floats tender). यासाठी न्यू ऑस्ट्रियन टर्निंग मेथड वापरण्यात येणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने याची माहिती दिली.

बुलेट ट्रेन मार्गाकरता भारतात पहिला प्रयत्न

author img

By

Published : Sep 23, 2022, 7:34 PM IST

मुंबई - नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने भारतातील सर्वात पहिली समुद्राखालील भुयारी मार्गाची निविदा जाहीर केली आहे. यासाठी न्यू ऑस्ट्रियन टर्निंग मेथड वापरण्यात येणार आहे. 21 किलोमीटर लांब बोगदा निर्माण करण्यासाठी निविदा जाहीर केली गेली. हा बोगदा झाल्यावर मुंबई आमदाबाद हायस्पीड रेल्वेचे काम प्रगतीपथावर जाणार आहे.

समुद्राखालील भारतातील पहिलाच बोगदा - मोदी शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प बुलेट ट्रेन आणि महाराष्ट्र शासनाने देखील सत्ता स्थापन झाल्यावर तातडीसाठी अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली. बुलेट ट्रेनसुद्धा मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर लवकर धावण्यासाठी शासन आग्रही आहे. आता समुद्राखालील भारतातील पहिलाच बोगदा निर्माण करण्यासाठीची बोली राष्ट्रीय हाय स्पीड रेल्वे महामंडळाने जाहीर केलेली आहे. बोगदा तयार करण्यासाठी अत्याधुनिक न्यू ऑस्ट्रियन टर्निंग पद्धती वापरली जाणार आहे.

कशाप्रकारे असेल बोगद्याचे काम - हा बोगदा एक प्रकारच्या ट्यूबसारखा असणार आहे. नेहमी बोगदा निर्माण करण्यासाठी पाच ते सहा मीटर व्यासाचे कटर हेड वापरले जाते. मात्र यासाठी 13.1 मीटर व्यासाचे कटर हेड वापरले जाणार आहे. जेणेकरून हायस्पीड रेल्वे जाण्यासाठी तेवढ्या व्यासाचा भूभाग कापणे आवश्यक आहे. 16 किलोमीटर लांबीच्या ह्या बोगद्यासाठी तीन टनल बोरिंग मशीनचा वापर केला जाईल. त्यापैकी पाच किलोमीटर बोगद्यासाठी न्यू ऑस्ट्रेलिया टर्निंग मेथडचा वापर करून बोगदा निर्माण केला जाईल. सात किलोमीटर लांबीपर्यंतचे बोगदा असेल.

जमिनीपासून 25 ते 65 मीटर खोल अंतरावर बोगदा - बोगदा जमिनीपासून साधारणतः 25 ते 65 मीटर इतक्या खोल असेल. याचा बिंदू ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा जवळ पारसिक डोंगराच्या 114 मीटर खाली असेल. ठाण्याच्या जवळील असलेली खाडी या खाडीच्या शेजारी असलेला पारसिक डोंगर आहे. या डोंगराच्या एकदम खालच्या भागांमध्ये भूगर्भात बोगद्याचे काम केले जाणार आहे. यासंदर्भात 22 जुलै 2022 रोजी निविदा मागवल्या होत्या. 20 ऑक्टोबर 2022 पर्यंत या निविदा अंतिमतः संबंधित प्राधिकरणाकडे जमा करायच्या आहेत. याची अंतिम तारीख 19 जानेवारी 2023 अशी आहे. अशी माहिती राष्ट्रीय हाय स्पीड रेल्वे महामंडळाच्या प्रवक्त्या सुषमा गौर यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.