मुंबई - राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर काही केल्या अजूनही कमी होताना दिसत नाही. त्यात ऑक्सिजन टंचाईची परिस्थितीही 'जैसे थे' आहे. आजही राज्यात 600 मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा आहे. हा तुटवडा कमी करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)कडून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार इतर राज्यातुन आणि औद्योगिक कंपन्यांकडून ऑक्सिजन अतिरिक्त ऑक्सिजन मागवण्यात येत आहे. यासाठी मोठ्या क्षमतेने ऑक्सिजन टँकरची गरज भासत आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी एफडीएने नायट्रोजन टँकरचे रूपांतर ऑक्सिजन टँकरमध्ये करण्यास सुरुवात केली आहे. तेव्हा आतापर्यंत 680 मेट्रिक टनने वाहन क्षमता वाढली आहे. तर सद्या आणखी 400 मेट्रिक टन ऑक्सिजन वाहून नेता येईल इतक्या क्षमतेच्या नायट्रोजन टँकरचे रूपांतर ऑक्सिजन टँकरमध्ये करण्याचे काम सुरू असल्याची माहिती एफडीएने दिली आहे.
आजही दिवसाला लागतोय 1800 मेट्रिक टन ऑक्सिजन
कोरोनाआधी राज्यात वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनची मागणी, गरज 350 ते 400 मेट्रिक टन इतकी होती. पण कोरोना काळात, पहिल्या लाटेत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ही गरज थेट 850 मेट्रिक टनवर गेली. फुफ्फुसावर कोरोना हल्ला करत असल्याने गंभीर रुग्णांना दम लागतो, श्वास घेण्यास त्रास होतो. अशावेळी त्यांना कृत्रिम ऑक्सिजन लागतो. त्यामुळेच ही गरज। वाढली. तर ही गरज पूर्ण करण्यासाठी एफडीएने राज्यात तयार होणाऱ्या 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनपैकी केवळ 20 टक्के ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी तर 80 टक्के वापर वैद्यकीय वापरासाठी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही मागणी पूर्ण करता आली. सप्टेंबर 2020 मध्ये थोडा फार ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. पण त्यानंतर ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाला. असे असले तरी दुसऱ्या लाटेत मात्र ऑक्सिजन पुरवठा यंत्रणाच 'ऑक्सिजन' वर गेल्याचे चित्र आहे. कारण दुसऱ्या लाटेत दिवसाला 65 ते 68 हजार नवे कोरोना रुग्ण आढळत असून सक्रिय रुग्ण सात लाखांच्या घरात आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या 10 टक्के रुग्णांना आज ऑक्सिजन लागत आहे. ही गरज दिवसाला 1800 मेट्रिक टन इतकी आहे. तर मागील 15 दिवसापासून ही परिस्थिती असून मागणी काही कमी होताना दिसत नाही. कारण आजच्या दिवशीही राज्यात दिवसाला 1800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे.
1270 मेट्रिक टन राज्यातून तर 250 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन मिळतोय इतर राज्यातून
राज्यात ऑक्सिजनची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेक रुग्ण मृत्यूमुखी पडत आहेत. तेव्हा ऑक्सिजनचा हा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी एफडीएने इतर राज्याची मदत घेतली आहे. तर राज्यातील ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. बंद प्लांट सुरू करत वा स्टील उत्पादकाकडून ऑक्सिजनचे उत्पादन वाढवले जात आहे. मात्र इतके करून ही राज्यात केवळ 70 मेट्रिक टन इतकेच उत्पादन वाढले आहे. तर इतर राज्यातुन 200 ते 250 मेट्रिक टन ऑक्सिजन कसाबसा उपलब्ध होत आहे. एकूणच 1800 मेट्रिक टन ची मागणी काही पूर्ण होताना दिसत नाही. 300 ते 350 मेट्रिक टन ऑक्सिजन कमी पडत आहे.
टँकरही पडत होते कमी
ऑक्सिजनची टंचाई दूर करण्यासाठी इतर राज्यातून ऑक्सिजन मागवण्यात येत आहे. तर राज्यातील उत्पादका कडून ही ऑक्सिजन मागवण्यात येत आहे. अशावेळी ऑक्सिजन वाहन क्षमता अपुरी पडत असल्याने एफडीएच्या अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वाहन क्षमता वाढवण्यासाठी एफडीएने नायट्रोजन वाहून नेणाऱ्या टँकरचे रूपांतर ऑक्सिजन टँकरमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. तर याचा फायदा होताना दिसत आहे. या निर्णयानुसार आतापर्यंत ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरची क्षमता 680 मेट्रिक टन इतकी वाढवण्यात आली आहे. तर अजून 400 मेट्रिक टनने वाहन क्षमता वाढवण्याचे काम अर्थात नायट्रोजन टँकरचे ऑक्सिजन टँकरमध्ये रूपांतर करण्याचे काम वेगात सुरू आहे. ही क्षमता वाढल्यास ऑक्सिजनची वाहतूक सुलभ होणार आहे.
ऑक्सिजन टँकरची क्षमता वाढली; आतापर्यंत 680 मेट्रिक टन क्षमतेच्या नायट्रोजन टँकरचे ऑक्सिजन टँकरमध्ये रूपांतर - oxygen tankers capacity increased
राज्यातील ऑक्सिजन टँकरची क्षमता वाढली; आतापर्यंत 680 मेट्रिक टन क्षमतेच्या नायट्रोजन टँकरचे ऑक्सिजन टँकरमध्ये रूपांतर