ETV Bharat / city

मुंबईत सोनू सूदच्या घरी तिसऱ्या दिवशी आयकर छापे

सोनू सूदचे घर आणि कार्यालयासह 6 ठिकाणी आयकर विभागाने सलग तिसऱ्या दिवशी छापे टाकले आहेत. या छाप्यात करचोरीचे सबळ पुरावे विभागाला मिळाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

sonu sood
sonu sood
author img

By

Published : Sep 17, 2021, 3:22 PM IST

मुंबई - आयकर विभागाने अभिनेता सोनू सूदच्या घर आणि कार्यालयावर सलग तिसऱ्या दिवशी छापे टाकले आहे. या छाप्यात आयकर विभागाला कर चुकवेगिरीचे सबळ पुरावे मिळाले आहेत. या प्रकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांची माहिती देण्यासाठी आयकर विभाग शुक्रवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार आहे.

सोनू सूदच्या घरी आयकर छापे
सोनू सूदचे घर आणि कार्यालयासह 6 ठिकाणी आयकर विभागाने सलग तिसऱ्या दिवशी छापे टाकले आहेत. या छाप्यात करचोरीचे सबळ पुरावे विभागाला मिळाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. हा कर फेरफार सोनू सूदच्या वैयक्तिक आर्थीक बाबींशी संबंधित आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या चित्रपटांमधून मिळालेल्या फीमध्ये कर अनियमितता दिसून आली आहे. यानंतर आयकर विभाग सोनू सूदच्या चॅरिटी फाउंडेशनच्या खात्यांचीही चौकशी करेल. या प्रकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांची माहिती देण्यासाठी आयकर विभाग शुक्रवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊ शकतो, असे वृत्त आहे.

सोनूसह अन्य ठिकाणीही कारवाई

शुक्रवारी आयकर विभागाकडून सोनू सूदच्या घरावर आणि कार्यालयावर कारवाई करण्यात येत आहे. मुंबईसह जयपूर, नागपूरसह अन्य ठिकाणी आयकर विभागाकडून कारवाई सुरू आहे. त्याचे चार्टड अकाउंटंट मुंबईबाहेर गेल्याने कारवाईला विलंब झाला होता. सोनूवरील ही कारवाई बुधवारपासून सुरू झाली आहे. मुंबई आणि लखनौच्या 6 मालमत्तांची चौकशी करण्यात आली आहे. सोनूच्या खात्यांमध्ये प्रचंड कर फेरफार केल्याचे पुरावे त्यांना मिळाले असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. सोनू सूदने कोरोना काळात अनेक गरजू लोकांना मदत केली होती. या मदतीमुळे अभिनेता मसिहा म्हणून प्रसिद्ध झाला आहे. आयकर विभागाने अभिनेत्याच्या मुंबईतील घरावर आणि कार्यालयावर छापे टाकल्यानंतर तो पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे.

हेही वाचा - ...येणाऱ्या काळात कोण सोबत येईल सांगता येत नाही; उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.