नवी मुंबई : नवी मुंबईतील ( Navi Mumbai ) नेरुळ ( Nerul ) परिसरातील सेक्टर 19 मधील जिमी पार्क इमारतीच्या आतील चार स्लॅब एकापाठोपाठ कोसळल्याची ( Four Slabs collapsed ) घटना घडली आहे. या इमारतीच्या आत असलेल्या 7 जखमींना बाहेर काढण्यात आहे. यामध्ये एक पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अद्यापही एक महिला स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत समाविष्ट होती. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारती खाली करण्याच्या सूचना मुंबई पालिकेने नागरिकांना दिल्या आहेत. मात्र, तरीही नागरिक घरे सोडत नाहीत आणि त्यांना दुर्घटनांना सामोरे जावे लागत असल्याच्या घटना घडत आहेत.
नवी मुंबई नेरुळ परिसरातील सेक्टर 17 मधील जिमी पार्क इमारतीच्या स्लॅबला भगदाड पडल्याने एकापाठोपाठ एक-दोन नव्हे तर चार स्लॅब आतून कोसळले. सद्यस्थितीत अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आतापर्यंत सात जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. आणखी एक महिला या ढिगाऱ्याखाली अडकली आहे. तिला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतर या इमारतीतील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
#UPDATE | Seven people have been shifted to hospital after a slab of the sixth floor of a building collapsed to the ground floor in Navi Mumbai. Rescue operation underway: Abhijit Bangar, commissioner, Navi Mumbai Municipal Corporation pic.twitter.com/3RNw4fchzg
— ANI (@ANI) June 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#UPDATE | Seven people have been shifted to hospital after a slab of the sixth floor of a building collapsed to the ground floor in Navi Mumbai. Rescue operation underway: Abhijit Bangar, commissioner, Navi Mumbai Municipal Corporation pic.twitter.com/3RNw4fchzg
— ANI (@ANI) June 11, 2022#UPDATE | Seven people have been shifted to hospital after a slab of the sixth floor of a building collapsed to the ground floor in Navi Mumbai. Rescue operation underway: Abhijit Bangar, commissioner, Navi Mumbai Municipal Corporation pic.twitter.com/3RNw4fchzg
— ANI (@ANI) June 11, 2022
6 व्या मजल्यावर घर दुरूस्तीचे काम सुरू होते-घटनास्थळी बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे व आयुक्त अभिजीत बांगर दाखल झाले आहे. आयुक्तांनी घटनेची पाहणी केली आहे. नवी मुंबईत एका इमारतीचा सहाव्या मजल्याचा स्लॅब तळमजल्यावर कोसळल्याने सात जणांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बचावकार्य सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे. संबंधित घटनेत 7 लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. सर्वांना जवळील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. यामध्ये 31 वर्षाचा पुरुष मृत्युमुखी पडला आहे. 6 व्या मजल्यावर घर दुरूस्तीचे काम सुरू होते. त्याच वेळी व्हायब्रेटरने लाद्या काढताना स्लॅब कोसळला. त्यानंतर एकावर एक असे 5 स्लॅब कोसळल्याची माहिती मिळाली आहे.
बचाव कार्य युद्ध पातळीवर- आज शनिवारी दुपारी 12: 50 च्या दरम्यान सेक्टर 17 जिमी पार्क इमारतीचा पाचव्या मजल्यावरील स्लॅब तळमाळयावर पडला. या ठिकाणी बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. घटनास्थळी नेरूळ, बेलापूर व वाशी अग्निशमन दलाच्या रेस्क्यू टेंडर उपस्थित आहे. या घटनेत, निशा धर्माणी (48),श्रिया धर्माणी(20),सोनाली गोडबोले( 29), आदित्यराज गोडबोले (15),सौमित्र गोडबोले (50), ललिता त्यागराजन (80), सुब्रमण्यम त्यागराजन(84) व व्यंकटेश नाडर (29) यांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर या घटनेत व्यंकटेश नाडर(29) याचा मृत्यू झाला आहे तर यामधील निशा धर्माणी (48), सुब्रमण्यम त्यागराजन (84) यांना उपचारासाठी नेरुळ मधील डी.वाय.हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. नेरुळ आपत्ती व्यवस्थापन कक्षाने ही माहिती दिली आहे.