ETV Bharat / city

कोल्हापुरात विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच होणार विजय - हसन मुश्रीफ - Satej Patil

विधानपरिषदेच्या(Legislative Council Election 2021) सहा जागांसाठी येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी काँग्रेसकडून (Congress) सतेज पाटील (Satej Patil) आणि भाजपकडून अमल महाडिक(BJP Candidate Amal Mahadik) यांच्यात ही लक्षवेधी लढत होणार आहे. या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ
author img

By

Published : Nov 16, 2021, 7:35 PM IST

मुंबई - विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी (Legislative Council Election 2021) कोल्हापूर मतदार संघात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर त्यांच्या विरोधात भाजपाच्या वतीने अमल महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, सद्य स्थिती पाहता कोल्हापूर जिल्ह्यात महा विकास आघाडीला सहज विजय मिळेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

गोकुळच्या दूध पिशव्यांना पाच पदर

दुधात अनेक ठिकाणी भेसळ होण्याच्या घटना समोर येत आहेत. दुधात भेसळ करण्यासाठी काही रसायने तर कित्येकदा अस्वच्छ पाणी वापरले जाते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळ होत असल्याने यावर कडक निर्बंध घालण्याचा प्रयत्न गोकुळ दूध संघ अर्थात कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री तथा गोकुळ दूध संघाचे नेते हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. गोकुळचे दुध वितरित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पॉलिथिनच्या पिशव्यांना आता पाच पदर करण्यात येणार आहेत. यामुळे दुधामध्ये सहजासहजी भेसळ करणे अशक्य होणार आहे. तरीही कुणी भेसळ करण्याचा प्रयत्न केल्यास ते तात्काळ नजरेस येणार आहे. त्यामुळे प्राथमिक स्तरावरच भेसळ रोखली जाईल, असा विश्वास गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

सह उत्पादनापेक्षा दूध वितरणावरच भर

गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून राज्यभरात दूध वितरण केले जाते. तसेच श्रीखंड, पनीर, बासुंदी यासारखे सह पदार्थही तयार करून विकले जातात. मात्र, मुंबईसारख्या महानगरांमध्ये सह पदार्थांपेक्षा दुधाला अधिक मागणी आहे. मुंबईमध्ये सध्या आठ लाख लिटर दूध विकले जाते ही विक्री 20 लाख लिटरपर्यंत नेण्याचा मानस असल्याचे यावेळी गोकुळने स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा - केंद्रातील सरकारही बरखास्त करा अन् देशात लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र घ्या - नाना पटोले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.