मुंबई - उत्पल पर्रीकर यांनी पक्षाचा त्याग केला आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता श्रीपाद नाईक राहीले तर तेही अस्वस्थ आहेत. (Former Goa CM Manohar Parrikar) असे सांगत भारतीय पक्षाचे मुख्य चेहरे आज बाहेर पडत आहेत. आणि भ्रष्टाचाराचे, व्यभिचाराचे, खंडणीचे, आरोपी असणारे हौशे, नौसे-गौसे भारतीय जनता पक्षाचे चेहरे झाले आहेत असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. दरम्यान, महाराणा प्रताप यांच्या औरंगाबादमधील स्मारकाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. (Shivsena MP Sanjay Raut Tweet on Utpal Parrikar) त्यावर बोलताना जर कोणी महाराणा प्रताप, शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला विरोध करत असेल तर त्यांनी शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांची तलवार आमच्या हातात आहे हे लक्षात ठेवाव असा इशाराही राऊत यांनी दिला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
गोव्यात मुळचे भारतीय जनता पार्टीचे लोक बाहेर पडत आहेत
आजच्या परिस्थितीत गोव्यात ज्यांनी भाजप वाढवला, भाजप रुजवला, ज्यांच्यामुळे भाजपला गोव्यात सत्ता मिळवता आली ते सर्व लोक बाहेर पडत आहेत. (NCP-ShivSena In Goa) आता वाळू माफिया, गुंड, खंडणीखोर, व्याभिचार करणारे असे लोक भाजपचा गोव्यात चेहरा बनत आहेत. त्यांच्या हातात नेतृत्व देण्याचा विचार आज भाजपचा आहे. मात्र, भाजप हा गोव्यात बहुमताकडे जाणार नाही हे तुम्हाला मी लिहून देतो अशी ठाम खात्री राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
आता उत्पल हे अपक्ष लढणार आहेत
राऊत यांनी (Shiv Sena MP Sanjay Raut) उत्पल पर्रिकर यांना भाजपला उमेदवारी द्यावीच लागेल असे सांगत त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही असे म्हटले होते. जातीचे राजकारण सुरू आहे. भाजपच ढोंग सुरू आहे असे सांगत आम्ही उत्पल पर्रीकर याला पाठिंबा देण्याचे दर्शविल्यानंतर भाजपची अडचण झाली आहे असा टोलाही राऊत यांनी लगावला होता. (BJP's difficulty in showing support) उत्पल अपक्ष लढल्यास पाठींबा देणार असेही म्हटले आहे. आता उत्पल हे अपक्ष लढणार आहेत. त्यावर शिवसेना काय भूमिका घेणार हा प्रश्न आहे.
हेही वाचा - India Corona Update : भारतात गेल्या 24 तासांत 3,33,533 नवीन कोरोना रुग्णांची नोंद