ETV Bharat / city

घाटकोपरमध्ये मनसेकडून पाच थराची दहीहंडी साजरी, कार्यकर्त्यांकडून निर्बंधांबाबत तीव्र प्रतिक्रिया

author img

By

Published : Aug 30, 2021, 10:34 PM IST

Updated : Aug 30, 2021, 11:04 PM IST

उद्या दही हंडी उत्सव आहे. मात्र, दहीहंडी उत्सवावर सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता निर्बंध घातले आहेत. मात्र, याचा मनसेने निषेध करत उद्या उत्सव करणारच असा पवित्रा घेतला आहे. घाटकोपरमध्ये तर आजच मनसेने पाच थराची दहीहंडी फोडून सरकारचा निषेध केला आहे. घाटकोपरच्या भटवाडी विभागात मनसेने ही दहीहंडी फोडून निषेध नोंदवला आहे. यावेळी एक गोविंदा सर्वात वरच्या थरावर चढला आणि त्याने दहीहंडी फोडली.

घाटकोपरमध्ये मनसेने दहीहंडी केली साजरी
घाटकोपरमध्ये मनसेने दहीहंडी केली साजरी

मुंबई - आज गोकुळाष्टमी आणि उद्या दही हंडी उत्सव आहे. मात्र, दहीहंडी उत्सवावर सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता निर्बंध घातले आहेत. मात्र, याचा मनसेने निषेध करत उद्या उत्सव करणारच असा पवित्रा घेतला आहे. घाटकोपरमध्ये तर आजच मनसेने पाच थराची दहीहंडी फोडून सरकारचा निषेध केला आहे. घाटकोपरच्या भटवाडी विभागात मनसेने ही दहीहंडी फोडून निषेध नोंदवला आहे. यावेळी एक गोविंदा सर्वात वरच्या थरावर चढला आणि त्याने दहीहंडी फोडली. या वेळी सर्व गोविंदानी मास्क लावत थर लावले होते. मात्र, पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करणार आहेत असा प्रश्न नागिरक विचारत आहेत.

मनसेने पाच थराची हंडी फोडत केला सरकारचा निषेध

'मनसेने घाटकोपर येथे दहीहंडी फोडून सरकारचा निषेध'

दहीहंडी साजरी करण्यावर निर्बंध लावण्यात आलेले आहेत. दहीहंडी साजरा करू नका असे आवाहन करण्यात आलेले आहे. मात्र, मनसेने आम्ही दहीहंडी साजरी करणार अशी भूमिका घेतली होती. ठाण्यामध्ये मनसे नेते अविनाश जाधव यांनी जोरदार तयारी केली होती. काल त्यांना नोटिसाही देण्यात आल्या होत्या. मात्र, यानंतरही त्यांनी काम सुरू ठेवले होते. आज त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र, कारवाई केली तरी आम्ही दहीहंडी साजरी करणार, यावर मनसे नेते ठाम आहेत. आज मनसेने घाटकोपर येथे दहीहंडी फोडून सरकारचा निषेध केला आहे. तर, दुसरीकडे राज्य सरकारने दहिहंडी साजरी करण्याबाबतच्या मार्गदर्शनक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांमध्ये दहिहंडी उत्सव प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करण्याता यावे, मानवी मनोरे उभे करून, एकत्र येऊन दहिहंडी उत्सव साजरा करू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दहिहंडीसाठी मार्गदर्शक सूचना

  • दहिहंडी उत्सव साधेपणाने घरी पुजा-अर्चा करून साजरा करावा.
  • सार्वजनिक पुजा अथवा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये.
  • दहिहंडी उत्सव प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करावा.
  • गर्दी टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारे दहिहंडी उत्सव एकत्रित येऊन साजरा करू नये
  • दहिहंडीसाठी मानवी मनोरे उभारताना शरीराचा संपर्क येत असल्याने कोरोनाचा वेगाने प्रसार होऊ शकतो त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मानवी मनोरे उभारून दहिहंडी साजरी करू नये,
    त्याऐवजी रक्तदान शिबीरे, आरोग्य शिबीरे असे उपक्रम राबवण्यात यावेत
  • केंद्र सरकारनेही दहिहंडी उत्सवात गर्दी झाल्यास कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते असा इशारा दिला आहे.

Last Updated : Aug 30, 2021, 11:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.