ETV Bharat / city

'लावा रे तो विडिओ' असं म्हणत इम्तियाज जलील यांची महाविकास आघाडी सरकारवर टीका - MIM ची तिरंगा रॅली

मुंबईत चांदिवली येथे इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार तोफ डागली. इतकंच नाही तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात विधानसभेबाहेर धरणं आंदोलनाचा इशाराच यावेळी जलील यांनी दिलाय.

Imtiaz Jalil
इम्तियाज जलील
author img

By

Published : Dec 12, 2021, 10:06 AM IST

मुंबई - मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या मुद्द्यावरुन खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel in Mumbai ) यांच्या नेतृत्वात एमआयएमकडून तिरंगा रॅलीचं (MIM Rally In Mumbai ) आयोजन करण्यात आलं. मुंबईत चांदिवली येथे इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार तोफ डागली. इतकंच नाही तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात विधानसभेबाहेर धरणं आंदोलनाचा इशाराच यावेळी जलील यांनी दिलाय. तसेच यावेळी एमआयएमने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानुसार लाव रे तो व्हिडिओ म्हणत मुस्लिम आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांच्या जुन्या प्रतिक्रिया दाखवल्या.

एमआयएमकडून तिरंगा रॅली
मुस्लिमांना आरक्षण न मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी पार्टी जबाबदार आहेत. तसंच, या पक्षातील मुस्लिम नेत्यांनी केवळ मतांसाठी मुस्लिमांच्या भावनांशी खेळले, असा आरोप व्हिडिओच्या माध्यमातून केला. काँग्रेस नेते आरिफ नसीम खान, आमिन पटेल, सपाचे आमदार अबु आझमी यांच्या प्रतिक्रिया दाखवल्या. ज्यामध्ये आमिन पटेल यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं नाही तर अधिवेशन होऊ देणार नसल्याचा इशारा देत असल्याचा व्हिडिओ दाखवला. आरिफ नसीम खान, शिवसेना नेते सुनील प्रभु आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मुस्लिम आरक्षणासंदर्भाती जुने व्हिडिओ दाखवण्यात आले.काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांनी मुस्लिम आरक्षणासंदर्भात मागणी करतानाचा व्हिडिओ एमआयएमने दाखवला. माणिकराव ठाकरे यांचा मुस्लिम आरक्षणासंदर्भात माध्यमांवर प्रतिक्रिया देतानाचा व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओमध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा देखील व्हिडिओ चालवण्यात आला. यामध्ये राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना देखील सोडण्यात आलं नाही. त्यांची देखील मुस्लिम आरक्षमासंदर्भातील भूमिकेचा व्हिडिओ दाखवण्यात आला. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा देखील व्हिडिओ दाखवण्यात आला. या सर्व प्रतिक्रिया हे सर्व नेते सरकारमध्ये नव्हते, तेव्हाच्या आहेत. यानंतर हे सर्व नेते जेव्हा सरकारमध्ये आले. तेव्हा एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांचा अधिवेशनात मुस्लिम आरक्षणासाठीची मागणी करत असतानाचा देखील व्हिडिओ यावेळी दाखवण्यात आला.

रॅलीचा उद्देश काय?

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासोबतच वक्फ बोर्डाच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी एमआयएमने रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीला तिरंगा रॅली असे नाव देण्यात आले होते. यासाठी औरंगाबादहून शेकडो गाड्या तिरंगा ध्वज लावून मुंबईला आल्या.

हेही वाचा - MIM Tiranga Rally : मी खासदार आहे की दहशतवादी; एमआयएचे इम्तियाज जलील यांचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.