ETV Bharat / city

मुख्यमंत्र्यांची लॉकडाऊनसंदर्भात 'टास्क फोर्स'सोबतची बैठक संपली, आता घोषणेची प्रतीक्षा - devendra fadnavis

या बैठकीतच राज्यातील लॉकडाऊनसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लॉकडाऊनसंदर्भात टास्क फोर्सची आज महत्वाची बैठक, काय निर्णय होणार याकडे राज्याचे लक्ष

author img

By

Published : Apr 11, 2021, 6:43 AM IST

Updated : Apr 11, 2021, 8:18 PM IST

मुंबई

8.15 pm

टास्क फोर्सच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची इतर मंत्र्यांसोबत चर्चा. मुख्यसचिव आणि गृहमंत्री, महसूल मंत्री आणि अर्थमंत्री यांच्यासोबत चर्चा. लॉकडाऊन बाबत चर्चा सुरू.
उद्या पुन्हा टास्क फोर्स सोबत मुख्यमंत्री घेणार बैठक.

7.34 PM

लॉकडाऊनसंदर्भात 'टास्क फोर्स'ची बैठक संपली आहे.

6.21 PM

मुख्यमंत्र्यांसह राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेही या बैठकीला उपस्थित आहेत. राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी राज्यात आठ दिवसाच्या लॉकडाऊन लावण्याचा विचार मुख्यंत्र्यांचा असल्याची माहिती सुत्रांकडून कळाली आहे. तर कोरोना साखळी तोडण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने 15 दिवसाचा लॉकडाऊन असावा असे मत आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केले असल्याचे कळत आहे.

6.16 PM

डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय ओक, हिंदुजा रुग्णालयाचे डॉ. झहीर उडवाडिया, लिलावती रुग्णालयाचे डॉ. नागांवकर, वोक्हार्ट रुग्णालयाचे डॉ. केदार तोरस्कर, फोर्टीस रुग्णालयाचे डॉ. राहुल पंडित, लोकमान्य टिळकरुग्णालयाचे शिव डॉ. एन.डी. कर्णिक, पी.ए.के रुग्णालयाचे डॉ. झहिर विरानी, केईएम रुग्णालयाचे डॉ. प्रविण बांगर, कस्तुरबा रुग्णालयाचे डॉ. ओम श्रीवास्तव हे यांचा सामावेश टास्क फोर्समध्ये आहे.

6.12 PM

डॉक्टरांच्या 'टास्क फोर्स'मध्ये मुंबईसह राज्यातील नामवंत डॉक्टरांचा समावेश आहे.

6.11 PM

सर्वपक्षीय बैठक शनिवारी सायंकाळी पार पडल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्स'ची बैठक सुरू झाली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.

बैठकीतील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

राज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही? लावायचा ठरल्यास त्याचा कालावधी किती दिवसांचा ठरवायचा? याविषयीचा निर्णय या बैठकीत होणार असल्याचे समजते आहे. सायंकाळी पाच वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक सुरू झाली. या बैठकीला मुख्यंमत्र्यांसह आरोग्यमंत्रीही उपस्थित आहेत. राज्यातील स्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनविषयीचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले असून विरोधी पक्षांनीही सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देऊ अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे या बैठकीत अंतिम निर्णय होऊन राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सर्वपक्षीय बैठकीत एकमत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये लॉकडाऊनबाबत एकमत झाले आहे. या सर्वपक्षीय बैठकीत महाविकास आघाडीतील मंत्र्यांसह विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. राज्यातील कोरोनाचा वाढता उद्रेक बघता कठोर निर्बंधांसाठी सर्वांनीच सहमती दर्शविली आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल, असे या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. बैठकीत दिलीप वळसे-पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, तात्याराव लहाने, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे हेही उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे ही बैठक पार पडली. बैठकीत कोरोनाच्या वाढत्या प्रसारावर चर्चा करण्यात आली. सीताराम कुंटे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती बैठकीत दिली.

जनतेला सरकारच्या प्लॅनची कल्पना द्या - फडणवीस

या बैठकीत सामान्य जनतेच्या सोयीसाठी काय करता येईल याबाबत नियमावली बनविण्यात येणार आहे. राज्यात 8 दिवसांच्या लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. दोन तास ही बैठक चालली. यामध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी सामान्यांचा उद्रेक होणार नाही असा निर्णय घ्यावा. आमचा सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे. सरकारच्या निर्णयाची जनतेला माहिती द्या. वेगवेगळ्या घटकांचा विचार व्हावा, लोकांसाठी काय प्लॅनिंग आहे हे तयार करावे लागेल असे फडणवीस यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी होकार दिला. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासाठी काय पॅकेज देता येईल, ते सोमवारी ठरविण्यात येणार असल्याचे आश्वासन अजित पवारांनी बैठकीत दिले.

आज चर्चा झाली, निर्णय उद्या होईल - अशोक चव्हाण

राज्यामध्ये कोरोनाचा आकडा सव्वापाच लाखांवर गेला आहे. यामुळे तातडीने कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. एकीकडे हा विषय असताना सामान्यांवरील संकटही आहे. मुख्यमंत्री दोन दिवसांत रोडमॅप तयार करणार आहेत. ते झाल्यानंतर कडक लॉकडाऊन करण्यात येईल, नंतर हळूहळू हे निर्बंध शिथिल करण्यात येतील, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. आज चर्चा झालीय, निर्णय झालेला नाहीय, उद्या यावर चर्चा होईल असे ते म्हणाले. लोक वाचले पाहिजेत, असे चव्हाण यांनी सांगितले.

Last Updated : Apr 11, 2021, 8:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.