ETV Bharat / city

महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून मोर्चेबांधणी - Raj Thackeray Latest News Mumbai

आगामी महापालिकांच्या निवडणुकांसाठी मनसेकडून मोर्चे बांंधणीला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी 11 वाजता मनसेची महत्त्वाची बैठक वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे पार पडली. या बैठकीसाठी पक्षप्रमुख राज ठाकरे आणि पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती होती.

महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून मोर्चेबांधणी

author img

By

Published : Jan 12, 2021, 11:00 PM IST

मुंबई - आगामी महापालिकांच्या निवडणुकांसाठी मनसेकडून मोर्चे बांंधणीला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी 11 वाजता मनसेची महत्त्वाची बैठक वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे पार पडली. या बैठकीसाठी पक्षप्रमुख राज ठाकरे आणि पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती होती.

स्थानिक पातळीवरील निवडणुका लढवण्यासाठी पक्षाने काय तयारी केली आहे, यासह पक्ष संघटनावर देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच येणाऱ्या महापालिका निवडणुकींसाठी टीम स्थापन करण्याचे आदेश देखील राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांना दिले आहेत. येणाऱ्या काळात औरंगाबाद, नवीमुंबई, नाशिक या काही महत्त्वाच्या महापालिकांची निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर तयारी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी नेत्यांना दिले आहेत. तसेच निवडणुकांसाठी टीम देखील स्थापण करण्यात येणार आहे. या टीममध्ये स्थानिक नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष, कार्यकर्ते यांचा सहभाग असणार आहे. प्रत्येक शहरानुसार ही टीम तयार करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले आहेत. शिवाय बुधवारी पुन्हा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आणखी एक बैठक होणार आहे.

महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून मोर्चेबांधणी

मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार

एकीकडे तीन मातब्बर पक्ष महाविकास आघाडी या बॅनर खाली एकत्र आले आहेत. तर दुसरीकडे मनसे महापालिका निवडणुकांसाठी भाजपसोबत युती करणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र आम्ही कोणासोबतही युती करणार नसून, निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे मनसे नेते सांगत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.