मुंबई - आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी शोधलेल्या महाकाय विषाणूंना वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. यामध्ये वांद्रा व्हायरस, कुर्ला व्हायरस, पवई लेक व्हायरस, मिमी व्हायरस बॉम्बे ही नावे देण्यात आली आहेत. आयआयटी मुंबईच्या काही संशोधकांनी पाण्याच्या नमुन्यावर अभ्यास केला. मुंबईतील सांडपाण्यामध्ये हे महाकाय विषाणू आढळून आले आहेत. या महाकाय विषाणूचा आकार इतर विषाणूंच्या तुलनेमध्ये मोठा आहे.
जायंट व्हायरस सर्वत्र अस्तित्वात असू शकतात. परंतु आम्ही नुकतेच त्यांना शोधण्यात सक्षम झाल्याचा दावा संशोधकांनी केला. "तथापी, सायन्स वायरच्या विषयावर बोलताना आयआयटी मुबंईचे प्रमुख संशोधक डॉ. अनिरुद्ध चटर्जी म्हणाले, की मनुष्यांमधील संक्रमणाशी थेट संबंध असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसा पुरावा उपलब्ध नाही. कारण नवीन प्रजाती नेहमीच शास्त्रज्ञांना खूपच आवडतात. मात्र चिंता करण्याचे काहीच कारण नाही, कारण हे विषाणू आजार पसरवणारे नाहीत.
मुंबईच्या पाण्यात सापडले हे विषाणू
आयआयटी बॉम्बेच्या शास्त्रज्ञांनी मुंबईतल्या सांडपाण्याचे संशोधन केले. तब्बल 5 वर्षे केलेल्या संशोधनात शास्त्रज्ञांना त्यांच्याबद्दल माहिती मिळाली आहे. हे व्हायरस एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातात. त्यावेळी ते शरीरातून डीएनएची माहिती कॉपी करतात आणि त्या डीएनएचे दुसऱ्याच्या शरीरात वहन करतात, असा दावा या संशोधकांनी केला आहे.
अशा पद्धतीने केले संशोधन
अशाप्रकारचा महाकाय विषाणू इंग्लंडमध्ये सापडला होता. इंग्लडच्या कुलिंग टॉवरवर 1992 साली अमिबामध्ये हा विषाणू सापडला होता. त्यानंतर आता हे विषाणू भारताच्या वातावरणात देखील सापडले आहेत. आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी 5 वर्ष अभ्यास केला. त्यांनी मुंबईतल्या पाण्याचे नमून तपासले. सांडपाणी, डेअरी युनिटचा जल उपचार प्रकल्प, घरगुती जल शुद्धिकरणापूर्वीचे पाण्याचे नमूने त्यांनी तपासले. त्याच्यावर अभ्यास केला असता त्यामधून त्यांनी हे महाकाय विषाणू शोधून काढले. यामध्ये 20 नवीन विषाणू आढळून आले आहेत.