ETV Bharat / city

पहिल्यांदाच आयआयटीमध्ये मिळणार बी.एस्सी. पदवीचे ऑनलाईन शिक्षण - आयआयटी मधून बीएस्सी न्यूज

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी नुकतेच डेटा विज्ञान मधील देशातील पहिल्या ऑनलाईन बी.एस्सी. पदवी अभ्यासक्रमाचे उद्घाटन केले असून त्याची सुरुवात यंदाच्या शैक्षणिक वर्षात केली जाणार आहे. आयआयटीमध्ये बी.एस्सी पदवीचे शिक्षण देण्याचा संपूर्ण अभ्यासक्रम हा आयआयटी मद्रास मधील तज्ज्ञांनी तयार केला आहे.

iit madras
पहिल्यांदाच आयआयटीमध्ये मिळणार बी.एस्सी. पदवीचे ऑनलाईन शिक्षण
author img

By

Published : Jul 1, 2020, 6:48 AM IST

Updated : Jul 1, 2020, 9:05 AM IST

मुंबई - अभियांत्रिकी तंत्रशिक्षण अधिक क्षेत्रातील आयआयटीमधील शिक्षण मिळावे, असे स्वप्न हजारो विद्यार्थी उराशी बाळगतात. परंतु अनेकांना ते स्वप्न पूर्ण करता येत नाहीत. मात्र अशा विद्यार्थ्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच आयआयटीमधून बीएस्सीची ऑनलाईन पदवी घेण्याची संधी मिळणार असून यासाठीची सुरुवात लवकरच आयआयटी मद्रासमधून होणार आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी नुकतेच डेटा विज्ञान मधील देशातील पहिल्या ऑनलाईन बी.एस्सी. पदवी अभ्यासक्रमाचे उद्घाटन केले असून त्याची सुरुवात यंदाच्या शैक्षणिक वर्षात केली जाणार आहे. आयआयटीमध्ये बी.एस्सी पदवीचे शिक्षण देण्याचा संपूर्ण अभ्यासक्रम हा आयआयटी मद्रास मधील तज्ज्ञांनी तयार केला आहे. हा पदवी कार्यक्रम देशभरातील कोणत्याही राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी खुला असणार असून दहावीमध्ये इंग्रजी आणि गणित विषयासह उत्तीर्ण झालेल्या आणि इयत्ता 12वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे.

पहिल्यांदाच आयआयटीमध्ये मिळणार बी.एस्सी. पदवीचे ऑनलाईन शिक्षण

आयआयटी मद्रासने तयार केलेला हा अभ्यासक्रम फाऊंडेशनल, डिप्लोमा आणि डिग्री कार्यक्रम या तीन वेगळ्या टप्प्यात करता येणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्णपणे ऑनलाइन कार्यक्रम आहे. ज्या विद्यार्थ्यांना फाउंडेशन कोर्स करायचा आहे, अथवा डिप्लोमा करायचा आहे त्या विद्यार्थ्यांना तितकी मुभा देण्यात येणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना पदवीचा पूर्ण अभ्यासक्रम करायची इच्छा आहे, त्यांना तशी सवलत दिली जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना कोणत्याही काळादरम्यान हा अभ्यासक्रम सोडण्याची मुभाही देण्यात आली आहे. त्या त्या विद्यार्थ्यांना आयआयटी मद्रासकडून अनुक्रमे प्रमाणपत्र, डिप्लोमा किंवा पदवी मिळविण्याचे स्वातंत्र्य असेल.

तीन हजार रुपये शुल्क-

बी.एस्सी पदवीच्या ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना एक पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तीन हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. शिक्षार्थ्यांना 4 विषयांची (गणित, इंग्रजी, सांख्यिकी आणि संगणकीय विचार) 4 आठवड्यांची अभ्यास सामग्री उपलब्ध करून दिली जाईल. हे विद्यार्थी ऑनलाईन व्याख्यान (लेक्चर) ऐकतील, ऑनलाइन असाइनमेंट सादर करतील आणि 4 आठवड्यांच्या शेवटी वैयक्तिक पात्रता परीक्षा देतील. आयआयटीच्या ठराविक प्रवेश प्रक्रियेच्या मर्यादित संख्येच्या-कॅम्पस जागांच्या विरुद्ध, या कार्यक्रमात पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी (एकूणच 50% गुणांसह) फाउंडेशन अभ्यासक्रमाला नोंदणी करण्यास पात्र ठरवले जाणार आहेत.

देशात यापूर्वी १ जुलै २०१५ रोजी आयआयटी मुंबईने विज्ञान, तंत्रज्ञानावर आधारित असलेले विविध प्रकारचे 24 अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरू केले होते. विशेष म्हणजे यातील अनेक अभ्यासक्रम हे मोफत देण्यात आले होते. विविध क्षेत्रात करिअर करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना आयआयटीतील ऑनलाईन अभ्यासक्रमाचा लाभ व्हावा यासाठीची सुरुवात 2015 मध्ये मुंबई आयआयटी सोबतच इतर सात आयआयटीने केली होती. मात्र पहिल्यांदाच आयटी मद्रास कडून बी.एस्सी पदवीचा अभ्यासक्रम सुरू केला जाणार असून पुढील काळात हा अभ्यासक्रम देशातील इतर आयआयटीमध्ये सुरू केला जाण्याची शक्यता आहे.

Last Updated : Jul 1, 2020, 9:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.