ETV Bharat / city

Nana Patole On ED Action : जनतेचा आक्रोश झाला तर केंद्र सरकारला भारी पडेल- नाना पटोले - श्रीधर पाटणकरांवर ईडीची कारवाई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली ( ED Action Shridhar Patankar ) असून, त्यांच्या ११ ममता जप्त केल्या आहेत. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जनतेचा आक्रोश झाला तर केंद्र सरकारला भारी पडेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली ( Nana Patole On ED Action ) आहे.

नाना पटोले
नाना पटोले
author img

By

Published : Mar 22, 2022, 7:28 PM IST

Updated : Mar 22, 2022, 9:09 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या ११ सदनिकांवर ईडीने जप्तीची कारवाई केली ( ED Action Shridhar Patankar ) आहे. या संदर्भामध्ये बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या कारवाईचा निषेध करत केंद्र सरकार जाणूनबुजून अशा पद्धतीने महाराष्ट्राच सरकार पाडण्यासाठी कारवाया करत असल्याचं सांगितलं आहे. जर अशा पद्धतीने जनतेचा आक्रोश झाला तर ते केंद्र सरकारला भारी पडेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. विधान भवनात ते बोलत ( Nana Patole On ED Action ) होते.

जनतेचा आक्रोश झाला तर केंद्र सरकारला भारी पडेल- नाना पटोले

११ सदनिका सील

ठाण्यात ईडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुष्पक बुलियन प्रकरणात श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील ११ सदनिका ईडीकडून सील करण्यात आल्या आहेत. या सदनिकांची एकूण मालमत्ता किंमत 6.45 कोटी असल्याचं सांगितलं जातं आहे.

एक दिवस जनतेचा आक्रोश होईल

या संदर्भामध्ये बोलताना नाना पटोले यांनी केंद्र सरकार तसेच केंद्रातील तपास यंत्रणांवर टीका केली आहे. या अगोदर छगन भुजबळ यांच्यावर सुद्धा अशा पद्धतीची कारवाई करण्यात आली. त्यासाठी त्यांना सव्वा दोन वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. पण त्यानंतर कोर्टाने त्यांना निर्दोष साबित केलं. वास्तविक महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हे सरकार पाडण्यासाठी अशा पद्धतीच षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून कुठल्याही परिस्थितीत हे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु त्याच्यात त्यांना यश येत नाही, असेही ते म्हणाले. एक दिवस या संपूर्ण प्रकरणात जनतेचा आक्रोश होऊन ते केंद्र सरकारला भारी पडेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Last Updated : Mar 22, 2022, 9:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.