ETV Bharat / city

Sanjay Raut On ED Action : मनी लॉन्ड्रिंग सिद्ध झाल्यास सगळी प्रॉपर्टी भाजपला दान करेल : संजय राऊत आक्रमक - संजय राऊतांचे ईडी भाजपला आव्हान

पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ( Patra Chawl Land Scam Case ) अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ( Varsha Sanjay Raut ) यांची प्रॉपर्टी जप्त केली ( ED Seized Varsha Sanjay Raut Property ) आहे. यावर संजय राऊत यांनी ईडीसह भाजपला आव्हान दिले ( Sanjay Raut Challenged ED BJP ) आहे. मनी लॉन्ड्रिंग केल्याचे सिद्ध झाल्यास माझी राहिलेली सगळी प्रॉपर्टी भाजपला दान करेल, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली ( Sanjay Raut On ED Action ) आहे.

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Apr 5, 2022, 3:58 PM IST

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली असून, अलिबागमधील आठ जागा आणि दादर पूर्व येथे असलेल्या गार्डन कोर्ट इमारतीतील फ्लॅट ईडीकडून जप्त करण्यात आला ( ED Seized Varsha Sanjay Raut Property ) आहे. ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत हे देखील आक्रमक झाले आहेत. आपल्याकडे एक रुपयाही मनी लॉन्ड्रिंग केलेला निघाल्यास आपण आपली पूर्ण प्रॉपर्टी भारतीय जनता पक्षाला दान करू, असं आव्हान संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला ( Sanjay Raut Challenged ED BJP ) दिले. केवळ राजकीय सूडापोटी आपल्यावर ही कारवाई केली जातेय. ही सर्व प्रॉपर्टी आपण कष्टाच्या कमाईतून उभी केली असल्याचे स्पष्टीकरण संजय राऊत यांच्याकडून देण्यात आले. मात्र केंद्र सरकारच्या विरोधात आपली लढाई आपण अशीच सुरू ठेवू, असेही संजय राऊत म्हणाले. दिल्लीत आपल्या शासकीय निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे स्पष्टीकरण ( Sanjay Raut On ED Action ) दिले.

भविष्यात त्यांचेही नंबर येतील : ईडीने आपल्यावर कारवाई केली असली तरी, आपण कोणाच्याही बापाला घाबरत नाही. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी वेळोवेळी आपल्यावर दबाव टाकला जात होता. या दबावातून ही कारवाई केली गेली असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला. राजकीय सूडापोटी आज आपल्यावर कारवाई केली जात असली तरी भविष्यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे देखील नंबर येतील असा इशारा भाजपला संजय राऊत यांच्याकडून देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.