ETV Bharat / city

Ganeshotsav 2022: हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक; मुस्लिम बांधवांकडून 25 वर्षांपासून दिली जाते गणपतीची मूर्ती - Idol Of Lord Ganesha

सध्या मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाची ( Ganeshotsav 2022 ) रंगत बघायला मिळत आहे. 1972 सालापासून शिव साई गणेश सेवा प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा ( Shiv Sai Ganesha Seva Pratishthan Ganeshotsav Mandal ) गणपती हा विशिष्ट आहे.मंडळात स्थापन करण्यात आलेली मूर्ती ही मुस्लिम बांधवांनी गेल्या 25 वर्षांपासून मंडळाला देण्यात येत असते हे विशेष आहे.

Shiv Sai Ganesha Seva Pratishthan
शिव साई गणेश सेवा प्रतिष्ठान
author img

By

Published : Sep 3, 2022, 4:05 PM IST

मुंबई - मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाची रंगत बघायला ( Ganeshotsav 2022 ) मिळत आहे. मुंबईत प्रत्येक विभागानुसार त्या-त्या ठिकाणचा राजा सध्या गणेश भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. मग लालबागचा राजा असेल परळचा राजा असेल, अंधेरीचा राजा असेल चिंतामणीचा राजा असेल त्याचप्रमाणे शिव साई गणेश सेवा प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ( Shiv Sai Ganesha Seva Pratishthan Ganeshotsav Mandal ) मोगरा पाडा इको स्पेस जवळ अंधेरी पूर्व बसवण्यात आलेला गणपती हा विशिष्ट आहे. 1972 सालापासून या मंडळाने उत्सव सुरू केला होता या वर्षी 51 वर्ष पूर्ण झाले असून यामध्ये स्थापन करण्यात आलेली मूर्ती ही मुस्लिम बांधवांनी गेल्या 25 वर्षांपासून या मंडळाला देण्यात येत असते हे विशेष.

मुस्लिम बांधवांमार्फत गणेश मूर्ती - शिव साई गणेश सेवा प्रतिठान ( Shiv Sai Ganesh Seva Pratithan ) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मोगरा पाडा इको स्पेस जवळ अंधेरी पूर्व या परिसरात गेल्या 51 वर्षापासून सलग गणपती बसवण्याची परंपरा आहे. तर तब्बल 25 वर्षांपासून या मंडळाची गणेश मूर्ती त्या परिसरातील राहणाऱ्या मुस्लिम बांधवांमार्फत देण्यात येते तसेच या उत्सवामध्ये मुस्लिम बांधव देखील सहभागी घेत असतात एकीकडे हिंदू आणि मुस्लिम असा वाद अनेकदा पाहायला मिळत असतो, मात्र हिंदू आणि मुस्लिम प्रमाण देणारा हा गणेश उत्सव मंडळ सर्वधर्मसमभाव असा उत्सव साजरा करत आहे. पाच दशके चालत असलेला हा गणेश उत्सव अगदी छोट्या स्वरूपात साजरा केला जातो. कौटुंबिक बांधिलकी विभागात असल्याने आज तिसरी पिढी मंडळाच कार्य पार पाडत आहे.गेली सतत 25 वर्ष एका मुस्लिम बांधवाकडून पूजेच्या मूर्ती दिली जाते. स्थानिक रहिवाशीच्या आणि काही भक्तगणांच्या म्हणण्यानुसार आपला गणपती नवसाला पावतो ह्या आश्या गोष्टींना कुठलही माध्यम न देता मंडळाची वाटचाल सुरु आहे.

नवसाला पावणारा गणपती म्हणून देखील ओळख - शिव साई गणेश सेवा प्रतिठान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तर्फे गणेशोत्सवामध्ये सामाजिक संदेश देण्याकरिता मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. गेल्या 51 वर्षांपासून या मंडळाने सामाजिक संदेश देत आहे लोकमान्य टिळकांनी ज्याप्रमाणे गणेशोत्सवाची स्थापना ज्या अर्थाने केली होती त्याच अनुषंगाने आम्ही काम करत आहे. या मंडळाला नवसाला पावणारा गणपती म्हणून देखील ओळख आहे या मंडळाचे मूर्तीचा खर्च हा गेल्या पंचवीस वर्षांपासून मुस्लिम समाजातील बांधव करत आहे. असे मंडळाचे अध्यक्ष प्रकाश शिंदे यांनी सांगितले आहे. माझ्या वडिलांनी गणपती समोर नवस बोलला होता त्यांच्या जीवनात सुरू असलेल्या अनेक संकटासंदर्भात आणि त्यांच्या इच्छा संदर्भात त्यांनी गणपती समोर बोललेला नवस पूर्ण झाल्याने माझ्या वडिलांपासून ते आस्थागायत आजपर्यंत आम्ही या मंडळाला गणपती मूर्तीचा खर्च करत आहे असे सलीम शेख यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :Gauri Pujan 2022: ऐका, जेष्ठा कनिष्ठा गौरीची कथा मराठीत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.