ETV Bharat / city

अरविंद सावंतांविरोधात पोलिसांत जाणार; खासदार नवनीत राणांची माहिती - नवनीत राणा अरविंद सावंत वाद

खासदार नवनीत राणा यांनी संसदेमध्ये सेनेवर भाष्य केले. मात्र त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप केला. यानंतर अरविंद सावंतांनी हे आरोप खोडून काढले होते. तसेच, त्यावेळी बोलताना त्यांनी राणांच्या देहबोलीवरही टीका केली होती. ज्यावर राणांनी आज सावंत यांना प्रत्युत्तर दिले होते. या सर्व आरोप-प्रत्यारोपांनंतर आता राणांनी सावंत यांच्याविरोधात पोलीस तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.

i-will-lodge-a-police-complaint-against-arvind-sawant-says-mp-navneet-rana
अरविंद सावंतांविरोधात पोलिसांत जाणार; खासदार नवनीत राणांची माहिती..
author img

By

Published : Mar 23, 2021, 1:44 PM IST

मुंबई : शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात आपण पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार असल्याची माहिती नवनीत राणा यांनी दिली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बचे पडसाद सोमवारी (२२ मार्च) संसदेत पडसाद उमटले. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी ही या प्रकरणावर सेनेवर भाष्य केले. मात्र त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप केला. तसं पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलं आहे.

अरविंद सावंतांविरोधात पोलिसांत जाणार; खासदार नवनीत राणांची माहिती..

यानंतर अरविंद सावंतांनी हे आरोप खोडून काढले होते. तसेच, त्यावेळी बोलताना त्यांनी राणांच्या देहबोलीवरही टीका केली होती. ज्यावर राणांनी आज सावंत यांना प्रत्युत्तर दिले होते. या सर्व आरोप-प्रत्यारोपांनंतर आता राणांनी सावंत यांच्याविरोधात पोलीस तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.

त्या म्हणाल्या, की आजही संसदेत मला बोलण्यास वेळ मिळाला तर मी अरविंद सावंतांना प्रश्न विचारेल. त्यांनी आपल्या स्पष्टीकरणात माझ्या देहबोलीबाबत टीका केली आहे. शिवसेना महिलांच्या देहबोलीसाठी काही प्रशिक्षण वर्ग घेते का? तसेच मला तुरुंगात कोणत्या मुद्द्यावर टाकणार आहात? असे प्रश्न मी त्यांना विचारेल.

हेही वाचा : 'माझी देहबोली कशी असावी ते तुम्ही शिकवू नका'; नवनीत राणांचं सावंतांना प्रत्युत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.