ETV Bharat / city

Rohit Pawar Comapny ED Action मला कुठल्याच कारवाईची नोटीस नाही; आमदार रोहित पवार यांचे स्प्ष्टीकरण - Interrogation of Rohit Pawar by ED

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यावर इडी कडून कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. ED notice On Rohit Pawar ग्रीन एकर्स या कंपनीतील व्यवहारा प्रकरणी ईडी कडून प्राथमिक चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली मात्र अशा पद्धतीची कोणतीही कारवाई सुरू नसल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना दिली आहे.

आमदार रोहित पवार
आमदार रोहित पवार
author img

By

Published : Aug 29, 2022, 8:20 PM IST

Updated : Aug 29, 2022, 8:41 PM IST

मुंबई - आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीकडून कारवाई होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या संदर्भात बोलताना रोहित पवार यांनी सांगितले, की अशी कोणतीही कारवाई सुरू नाही. या केवळ अफवा आहेत. ED notice against Rohit Pawar आपल्या विरोधात केलेली कारस्थाने आहेत. अशा पद्धतीची कोणतीही कारवाई सुरू नसल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

का म्हणाले कंबोज गबरू जवान भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांनी ट्विटद्वारे एक गब्रू जवान एकविसाव्या वर्षी कशी काय एवढी संपत्ती जमा करतो कशा कंपन्या स्थापन करतो असा सवाल च्या माध्यमातून उपस्थित केला आहे. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना रोहित पवार म्हणाले की ते आम्हाला जवान म्हणाले आहेत याचा आम्हाला आनंदच आहे कारण सर्व जवान आमच्या सोबत आहेत आणि आम्ही जवानांसाठी आणि युवकांसाठीच सातत्याने सकारात्मक काम करतो आहे जनता त्याची दखल घेईल.

ऐतिहासिक दस्तावेज परत आणण्यासाठी प्रयत्न महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार असेल, जगदंबा तलवार असेल, होळकर शिंदे यांची शास्त्री असतील, तसेच अनेक ऐतिहासिक दस्तावेज असतील हे आजही भारताबाहेर आहेत. हे भारताबाहेर असलेले ऐतिहासिक दस्तावेज पुन्हा एकदा भारतात यावेत आणि इथल्या जनतेला इतिहासात या महत्त्वाच्या ठेव्याचा लाभ घेता यावा यासाठी आपण विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार आज चर्चा झाली आणि यापुढेही सकारात्मक चर्चा होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे असेही पवार म्हणाले आहेत.

पोलिसांच्या सुट्टीसाठी प्रयत्न गणेशोत्सव किंवा अन्य उत्सवा दरम्यान किंवा अन्य कार्यक्रमांचा दरम्यान ही पोलिसांवर खूप ताण येतो. पोलिसांना सुट्ट्या मिळत नाहीत, पोलिसांच्या सुट्ट्यांचा प्रश्न आपण उपस्थित केला होता त्या दृष्टीनेही आपण काम करीत आहोत असेही ते म्हणाले आहेत.

हे तात्पुरते परिवर्तन महाराष्ट्रात सध्या झालेले परिवर्तन असेल किंवा आमदारांनी केलेला पक्ष बदल असेल हे तात्पुरते परिवर्तन आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला हे परिवर्तन मान्य नाही आणि जनता त्यांना स्वीकारणार नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून किंवा आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून जोरदार प्रयत्न करत आहोत. त्याच दृष्टीने शरद पवार दौरे करत आहेत. आम्हाला नक्की यश येईल असेही रोहित पवार यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Artemis Launch postponed इंजिन खराब झाल्यामुळे आर्टेमिस लाँच पुढे ढकलण्यात आले

Last Updated : Aug 29, 2022, 8:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.