ETV Bharat / city

Pankaja Munde : 'केंद्र व राज्य, दोन्ही राजकारणात मला रस' पंकजा मुंडेंची EXCLUSIVE मुलाखत - पंकजा मुंडेंची EXCLUSIVE मुलाखत

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) यांच्या संघर्षाचा वारसा लाभलेल्या, ओबीसी समाजाचा चेहरा असलेल्या आणि सकारात्मक राजकारणावर विश्वास असलेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांच्याशी राष्ट्रीय राजकारणासोबत विविध विषयांवर केलेली बातचीत..

'केंद्र व राज्य, दोन्ही राजकारणात मला रस' पंकजा मुंडेंची EXCLUSIVE मुलाखत

author img

By

Published : Nov 24, 2021, 4:19 PM IST

Updated : Nov 27, 2021, 9:36 AM IST

मुंबई : दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) यांच्या संघर्षाचा वारसा लाभलेल्या, ओबीसी समाजाचा चेहरा असलेल्या आणि सकारात्मक राजकारणावर विश्वास असलेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांच्याशी राष्ट्रीय राजकारणासोबत विविध विषयांवर केलेली बातचीत..

'केंद्र व राज्य, दोन्ही राजकारणात मला रस' पंकजा मुंडेंची EXCLUSIVE मुलाखत
प्रश्न - राष्ट्रीय स्तरावर खूप मोठ्या उलथापालथी होत आहेत, नवीन बदल होत आहेत. याकडे तुम्ही कसे पाहता? महाराष्ट्रासाठी एकूण पक्षाच्या बांधणीसाठी हे किती महत्त्वाचे आहे?
पंकजा मुंडे - मला वाटतं हे राज्यासाठी योग्य आहे. याचा परिणाम सकारात्मक होणार आहे. पक्षाच्या बांधणीसाठी याचा खूप उपयोग होणार आहे.

प्रश्न - विनोद तावडे यांना केंद्रात स्थान देण्यात आले, तुम्हाला स्थान देण्यात आलेलं आहे आणि त्या पाठोपाठ चंद्रशेखर बावनकुळे यांनासुद्धा उमेदवारी दिली. कुठेतरी सत्तेचे विकेंद्रीकरण होतेय अशा पद्धतीचे चित्र निर्माण होते का?
पंकजा मुंडे - आता बावनकुळेंना दिलेले टिकीट आहे, ती चांगली बातमी. त्चांचे अभिनंदन करते. विनोद तावडे प्रवाहात होते. चिटणीस होते. माझ्यासोबत आणि आता ते सरचिटणीस झालेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सरचिटणीस हे फार महत्त्वाचे पद आहे. कारण या पदासाठी शंभर टक्के वेळ देणारी व्यक्ती लागते. आणि त्याचं वास्तव्य दिल्लीमध्ये असावं लागतं. त्यांना प्रवास करावा लागतो. मुंडे, प्रमोद महाजन आणि नितीन गडकरी यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलेले आहे. याचा संघटनेला फायदा होणार आहे. त्याचा उपयोग होणार आहे.

प्रश्न - ताई माझ्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही. हे सतत कुठेतरी भाजपाच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण होतंय, दुसऱ्या फळीतील नेत्यांना स्थान देण्याचा प्रयत्न, अशा पद्धतीचे चित्र निर्माण केले गेले किंवा होते असे वाटते का?
पंकजा मुंडे - आम्ही दुसऱ्या फळीतले नेते आहोत असं मला वाटत नाही. आम्ही सर्व एकाच फळीचे नेते आहोत. हे मोठं आव्हान असतं. पण आम्ही सर्व समकालीन आहोत. एकत्र काम केलेले, एक सारख काम करत होतो आणि विकेंद्रीकरण हा विषय बघायला गेले, तर केंद्रीकरण नाहीये असा त्याचा अर्थ होतो.

प्रश्न - राज्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने भाजपाने प्रयत्न केलेला आहे की, सत्ताधाऱ्यांना खाली खेचून सत्तांतर करावं, अशा पद्धतीचा प्रयत्न सुरू होता. परंतु तुम्ही अतिशय स्पष्टपणे सांगितले की, या सगळ्या गोष्टींमध्ये जाण्यापेक्षा आपण जर विरोधी पक्षात आहोत विरोधकांची भूमिका करतोय तर त्यावर अधिक सक्षमपणे लक्ष दिले पाहिजे. आणि त्यानंतर देवेंद्र यांनी आता काल-परवा भाषणामध्ये म्हणाले की आपण विरोधकाची भूमिका सक्षम पणे करायला हवी. हा बदल तुमच्या बोलल्यानंतर झाला का? पक्षाला आता जाग आली आहे नेमकं काय?
पंकजा मुंडे - असं म्हणणं चुकीचं की, माझ्या बोलल्यानंतर हा बदल झालाय. याच्यासाठीच मी म्हटले होते की कार्यकर्ते संभ्रमात राहू नये. कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा विरोधी बाकावरचा आहे. तो प्रचंड संघर्ष करायला मागेपुढे न बघणारे कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता म्हणून म्हटलं तर ते रस्त्यावर उतरतील आणि ते सरकारच्या प्रत्येक विषयावर आवाज उठवतील आणि त्याचा परिणाम नक्की संघटनेला ताकद मिळण्यामध्ये आणि जनतेच्या हिताचे काम करण्यामध्ये आहे.

प्रश्न - राज्य स्थिर करण्यासाठी भाजप सातत्याने प्रयत्न करते अशा पद्धतीचा आरोप होतो आहे. ज्यामध्ये एसटीचे आंदोलन असेल किंवा अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार असेल..
पंकजा मुंडे - हे चुकीचे आहे. अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार मला वाटत नाही, त्यात पक्षाचाी काही भूमिका असेल. सरकार अस्थिर करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला प्रयत्न करण्याची आवश्यकता काय? हे सरकार अस्थिरच आहे.दोन पायावर नसून हे तीन पायावर उभे असलेले सरकार आहे.

प्रश्न - एसटी आंदोलनाबाबत कुठेतरी संभ्रमाचे वातावरण पक्षात आहे का? कारण गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ म्हणतात एसटीचे विलीनीकरण करा, तर देवेंद्रजी म्हणतात हे शक्य नाही. विलीनीकरण होऊ शकत नाही.
पंकजा - सरकारने याच्यामध्ये मध्यम मार्ग काढायचा आहे. हे काम सरकारचं आहे की, एसटीच्या आंदोलनाला कसा न्याय द्यायचा? हे सरकारने ठरवावे. एखाद्या व्यक्तीने एखाद्या गोष्टीला पाठिंबा दिला, एखादा लोकप्रतिनिधी असेल आणि देवेंद्र यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केले त्यांनी आपल्या मताप्रमाणे योग्य भूमिका मांडली असेल.

प्रश्न - आपल्याला पक्षामध्ये न्याय मिळालाय पूर्णपणे असं वाटतंय का? कारण पूर्वीसुद्धा गोपीनाथजींना दोन वेळा संघर्ष करावा लागला पक्षामध्ये आपली प्रतिमा उंचावण्यासाठी व योग्य स्थान मिळवण्यासाठी. तुमच्या कार्यकर्त्यांनीही मागे उद्रेक केला होता. आता तुम्हाला असं वाटतंय का की पक्षामध्ये तुम्हाला योग्य संधी आणि स्थान मिळाले आहे?
पंकजा - आता कुठलीच घटना घडली नाहीये. काही दिवसांपूर्वी काही वेगळी परिस्थिती होती. भारतीय जनता पक्षाची संकल्पना, या पक्षाने आजवर कधी अन्याय केला असे मी समजतच नाही. यासाठी माझे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माझे प्रधानमंत्री आहेत. आणि त्यांची भूमिका असते मोठं चित्र ते बघतात. मोठ्या चित्रामध्ये योग्य वेळी योग्य माणसाला ते नक्कीच संधी देतात. माझा विश्वास आहे. माझ्यावर कोणी अन्याय केला, असं मी म्हणणार नाही. राज्यामध्ये कार्यकर्त्यांच्या मनात आपले स्थान असते. म्हणजे आपल्या नेत्यावर कार्यकर्त्याचे प्रेम असतं. आपला कार्यकर्ता खूप भाऊक असतो. आणि त्याला वाटत असते आपल्या नेत्याला स्थान मिळावं आणि पेशन्स ठेवावे लागतात. मी आता एवढ्या लोकांना संयमाने हाताळले. पत्रकार परिषदेमध्ये माझी भूमिका वेळोवेळी सांगितलीय.

प्रश्न - भाजपने राज्यातल्या विविध मुद्द्यांवर आक्रमक होण्याची गरज आहे का? राज्यातील शेतकऱ्यांचे मुद्दे असतील, विकासाचे मुद्दे असतील, थांबलेले प्रकल्प असतील या सगळ्या मुद्द्यांवर बोलायला हवं. कारण सध्या वेगळ्याच प्रकरणांवर पक्ष बोलतोय अशा पद्धतीचा संपूर्ण चित्र निर्माण झालंय.
पंकजा - हो आपण सर्व विषयांवर बोलले पाहिजे. शेतकरी असतील , विमा प्रश्न असेल या विषयांवर आम्ही बोलतोच. आणि सध्या ज्या विषयांवर चर्चा सुरू आहे ते मुद्देही महत्त्वाचे आहेत.

प्रश्न - ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकारने टांगता ठेवला आहे. या संदर्भामध्ये राज्य सरकार काही करत नाही असे म्हणता, राज्य सरकार म्हणते केंद्राकडून सहकार्य मिळत नाही नेमकं घोडे कुठे अडले आहे?
पंकजा - राज्य सरकारला सांगायची आवश्यकता नाही. आणि कोणी करायचं त्यांना समजले, कळले पण वळत नाहीये. त्यांनी इम्पिरीकल डेटा मिळवायला पाहिजे. त्यासाठी पैसे द्यायला पाहिजे. मागासवर्गीय आयोगाला आणि ओबीसी आरक्षणाची कार्यवाही लवकर केली पाहिजे.

प्रश्न - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. डी लिमिटेशन्स आता केले जात आहे. हे डीलिमीटेशन् सोयीप्रमाणे केले जात आहे का?
पंकजा - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आता सुरूवात झाली आहे. ते काय करतात डीलिमिटेशन कसे झाले आहे याचे आराखडे जेव्हा बाहेर येतील तेव्हा त्याच्यावर भाष्य करता येईल. आताच काही आक्षेप घेतले तर योग्य नाही. नक्कीच चुकीचं झालं तर त्याबाबत विरोध केला जाईल.

प्रश्न - राज्य सरकारला आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन वर्षांमधल्या राज्य सरकारच्या कामाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय?
पंकजा - निराशाजनक आहे . शेतकरी,महिला असतील व प्रशासकीय कर्मचारी असतील प्रशासकीय संघटना असलेल्या सर्व पातळीवर मला वाटतं लोकांची निराशा झाली. मंत्रीमंडळाची प्रतिमा स्वच्छ असायला पाहिजे खास करून सरकारचे जी व्यक्ती उद्धव ठाकरे नेतृत्व करत आहे त्यांची प्रतिमा स्वतःची चांगली आहे आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये चांगल्या प्रतीचे लोक असले पाहिजे ही अपेक्षा आणि त्यांनी त्याच्याबाबत खंबीर पावले उचलली पाहिजे.

प्रश्न - स्थानिक आता निवडणुका झाल्या असतील तर कारखान्याचे असतील यामध्ये कुठेतरी आपली पिछेहाट होते अशा पद्धतीचं वातावरण आहे का?
पंकजा - नाही ,अशा पद्धतीच्य़ा निवडणूका आता झाल्या नाहीत. मात्र भविष्यात होणा-या निवडणुका आमच्यासाठी कठीण असतील. कारण कार्यकर्त्यांमध्ये संभ्र्म निर्माण करण्यात आणि सत्तेचा वापर करण्यात आमच्या विरोधकांचा हात कुणी धरू शकत नाही.

प्रश्न - परळी मतदारसंघाकडे तुमचे दुर्लक्ष आहे असे स्थानिक स्तरावर बोलले जात आहे नेमकं काय तुम्ही मतदारसंघांमध्ये किती काम करता?
पंकजा - माझ्या मतदारसंघात मला जेवढ आवश्यक वाटतं तेवढं काम करते आहे. आणि माझ्या मतदार संघावर दुर्लक्ष होते असा अपप्रचार जास्त राष्ट्रवादीचे लोक करतात. कारण त्यांना स्वतःच्या चांगले सांगायला काही नाही. त्यामुळे माझ्या दुर्लक्ष होते जास्त फोकस करतात. त्याचा नुकसान होऊ शकतं लोकांच्या मनामध्ये सत्य वाटायला लागते. पण त्यांचे काम आहेत त्यांची प्रतिमा नेत्यांचे भ्रष्टाचार आहे. त्याच्यामुळे लोक खूप वैतागले आहेत. त्यांच्या दबावाचा आणि त्याच्या दहशतीचा परिणाम निवडणुकीत नक्की जाणवणार आहे. त्याला आम्ही लढाईसाठी तयार आहे.

प्रश्न - तुम्हाला राष्ट्रीय राजकारणात इंटरेस्ट आहे की राज्याच्या?
पंकजा - मला राज्याच्या आणि राष्ट्रीय राजकारणात दोन्ही ठिकाणी इंटरेस्ट आहे. राष्ट्रीय पद असले तरी मी राज्याचे राजकारण सोडलेले नाही. मला दोन्ही राजकारणात चांगलाच रस आहे.

Last Updated : Nov 27, 2021, 9:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.