मुंबई - पार्टीचे ज्या कासिफ नावाच्या व्यक्तीकडून निमंत्रण मिळाल्याचे सांगितले जात आहे, त्याला मी ओळखतच नाही, असे स्पष्टीकरण मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पत्रकार परिषदेत केले. तसेच एनसीबीने या प्रकरणाचा खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली. पार्टी प्रकरणी प्रकरणी मंत्री अस्लम शेख यांना पार्टीचे निमंत्रण दिल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नबाव मलिक यांनी केला होता. मंत्री अस्लम शेख यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली.
क्रूझवरील पार्टी कल्पना नव्हती
एनसीबीच्या क्रूझवरील कारवाईवरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची कारवाई संशयास्पद असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातील अनेक बाबी प्रसार माध्यमांसमोर मांडल्या. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना ही कासीफ खानने निमंत्रण दिल्याचे मलिक यांनी म्हटले होते. मंत्री शेख यांनी यावर प्रतिक्रिया दिली. 'कासीफ खान नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही. कधीच त्याला भेटलो नाही. मुंबईचा पालकमंत्री म्हणून मला पार्टीला बोलावण्यात आले होते. काशिफ खानकडे माझा नंबर आहे की नाही मला माहीत नाही. माझा मोबाईल पीए कडे असतो. तो एका ठिकाणी मला भेटला होता. तो तिथे कसा आला मला माहीत नाही. त्या पार्टीत काय होणार होते याची कल्पना नाही. तपास यंत्रणेने ते शोधून काढावे, असे अस्लम शेख यांनी सांगितले. संभाषण झाल्याचा दावा ही त्यांनी फेटाळून लावला.
गुजरातकडे दुर्लक्ष
अनेक लोक लग्न सोहळे, वाढदिवसाला मला बोलवत असतात. दिवसभरात मला 50 लोक मला आमंत्रित करत असतात. एखाद्या लग्नात गेलो तर लोक वाढदिवसाचे ही निमंत्रण देतात. ज्या कार्यक्रमात जातो, त्याची माहिती घेत असतो. जिथे जातच नाही, त्याची माहिती घेत नाही. मला वाटत ज्या कार्यक्रमाला जायचे नाही त्याची माहिती घेणेही योग्य नाही, असेही अस्लम शेख यांनी सांगितले. सुरुवातीला हे ड्रग्स प्रकरण वाटत होते. त्याच वेळी गुजरातमध्ये 20 हजार कोटीचे ड्रग्ज पकडले गेले. शाहरुख खानच्या मुलाचे नाव आल्यानंतर मीडियाने त्याचे कव्हरेज सुरू केले. त्यामुळे गुजरातमधील ड्रग्सवर चर्चा झाली नाही, असे सांगत या प्रकरणाकडे लक्ष वेधले. मुलाला नशामुक्ती केंद्रात पाठवायला हवे होते, की नाही हे तपासायला हवे होते. दिशा सलीयन हिच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरे यांचे नाव चर्चेत नाव आले होते. पुढे त्याचे काय झाले, असेही अस्लम शेख म्हणाले.
हेही वाचा - गोसावीच्या सेल्फीमुळे सगळे पैसे गेले; कथित प्रत्यक्षदर्शी विजय पगारेच्या दाव्याने खळबळ