ETV Bharat / city

Sharad Pawar : पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार मागे घेण्याने मला आनंद - शरद पवार - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

भारतीय जनता पक्षाने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात (Andheri East Assembly ByElection) होणाऱ्या पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली आहे. भाजपने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही केलं आहे. तर या निर्णयामुळे आपल्याला आनंद झाला असल्याचं शरद पवारांनी (I am happy that BJP has withdrawn its candidate) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Sharad Pawar
शरद पवार
author img

By

Published : Oct 17, 2022, 5:42 PM IST

मुंबई : भारतीय जनता पक्षाने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात (Andheri East Assembly ByElection) होणाऱ्या पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली आहे. भाजपने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही केलं आहे. तर या निर्णयामुळे आपल्याला आनंद झाला असल्याचं शरद पवारांनी (I am happy that BJP has withdrawn its candidate) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

चर्चांना पूर्णविराम : तसेच भाजपाने हा निर्णय आधीच घ्यायला पाहिजे होता. तर या निवडणुकीत आपला पराभव समोर दिसत असल्याने, भाजपाने माघार घेतली असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहेत. मात्र यावरही शरद पवार यांनी, भाजपाने घेतलेल्या निर्णयावर आता शंका घेण्याचं कोणतेही कारण दिसत नाही, असं म्हणत सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपने दिला सकारात्मक प्रतिसाद : अंधेरी पूर्व मतदार संघातील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आपण भारतीय जनता पक्षाला आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला भाजपने सकारात्मक प्रतिसाद दिला. भाजपने घेतलेला हा निर्णय योग्य आहे. तसेच आपण केलेल्या आवाहना नंतर भाजपने हा निर्णय घेतला. आपल्या आवाहनाचे उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वागत करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन केलं नाही. मात्र आता त्यांच्या आवाहनाची गरज नसल्याचेही, यावेळी शरद पवार म्हणाले आहेत.

खेळात राजकारण नाही : एमसीएची निवडणूक होत आहे. खेळ संघटनेच्या याआधी आपण अनेक वेळा निवडणूक लढवल्या आहेत. त्यामुळे कधीही आपण खेळाच्या संघटनांमध्ये राजकारण आणत नाही. आणि इतर कोणीही तसं राजकारण करत नसेल. याआधीही मी एमसीएचे अध्यक्ष आशिष शेलार यांना सहकार्य केलं होतं, याची आठवणही शरद पवारांनी यावेळी करून दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.