ETV Bharat / city

'तौक्ते' चक्रीवादळ काही तासात कोकण किनारपट्टीला धडकणार, मुसळधार पावसाचा इशारा - कोकण किनारपट्टीला चक्रीवादळ धडकणार

अरबी समुद्राच्या आग्नेय भागात लक्षद्वीप बेटांच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला पुढील ते अजून सक्रिय होऊन 24 तासात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. तसेच या वादळाचा परिणाम 15 ते 17 मे दरम्यान दक्षिण कोकण व गोव्याच्या किनाऱ्यावरही होण्याची शक्यता आहे.

Hurricane Tokte hits Konkan coast
Hurricane Tokte hits Konkan coast
author img

By

Published : May 14, 2021, 4:57 PM IST

Updated : May 14, 2021, 7:22 PM IST

मुंबई - अरबी समुद्राच्या आग्नेय भागात लक्षद्वीप बेटांच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला पुढील ते अजून सक्रिय होऊन 24 तासात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. तसेच या वादळाचा परिणाम 15 ते 17 मे दरम्यान दक्षिण कोकण व गोव्याच्या किनाऱ्यावरही होण्याची शक्यता असल्याचे कुलाबा वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे.

चक्रीवादळ काही तासात कोकण किनारपट्टीला धडकणार
लक्षद्वीप बेटांच्या परिसरात अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून पुढील २४ तासांमध्ये त्याची तीव्रता आणखी वाढून त्याचे रूपांतर चक्रीवादळात होणार आहे. या चक्रीवादळाचे तौक्ते असे नाव म्यानमार या देशाने ठेवलेले आहे. 15, 16 आणि 17 तारखेला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला आणि गुजरात किनारपट्टीला याचा मुख्यत: प्रभाव असेल. त्याबरोबर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात सुद्धा याचा प्रभाव दिसेल. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यात याचा प्रभाव दिसेल. म्हणजे मुसळधार पाऊस आणि वादळी वारे असण्याची शक्यता असल्याचे कुलाबा वेधशाळेच्या वैज्ञानिक शुभांगी भुत्ते यांनी सांगितले.
Hurricane Tokte hits Konkan coast
तोक्ते’ चक्रीवादळ काही तासात कोकण किनारपट्टीला धडकणार
16 आणि 17 तारखेला मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यात सुद्धा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान समुद्र खवळलेला असेल तर अजून रुद्र स्वरूपाचा असेल. तर 40 ते 60 किलोमीटर वेगाने किनारपट्टी भागावर वारे वाहण्याची शक्यता आहे.
मच्छिमारांना किनाऱ्यावर परत येण्याचा इशारा -
अरबी समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छिमारांना परत बोलवण्यात येत आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. नागरिकांनी समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये. समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

Last Updated : May 14, 2021, 7:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.