मुंबई - 2021 मधील पहिले चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण होणार आहे. अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश्य धोकादायक स्थिती निर्माण झाली असून 16 तारखेला सकाळपर्यंत हे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कुलाबा वैधशाळाच्या वैज्ञानिक शुभांगी भुत्ते यांनी सांगितले. या चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्ट्यांना बसणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
येत्या 14 तारखेला अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून त्याची तीव्रता वाढून 16 तारखेला त्याचे रूपांतर चक्रीवादळात होईल. याचा प्रभाव महाराष्ट्र गोवा किनारपट्टीला जाणवेल. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस या भागात पडेल. सोबत त्याचा प्रभाव मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सुद्धा बघायला मिळेल. त्यानंतर अरबी समुद्र रौद्ररूप धारण करेल. सोबतच वाऱ्याचा वेग ४० ते ५० किलोमीटर प्रतितास असेल. कधी-कधी त्याची तीव्रता ६० किलोमीटर इतके वाढेल. या दिवसांमध्ये मच्छीमारांसाठी शहरातील समुद्रात जाऊ असा इशारा देण्यात आला असल्याचे भुत्ते यांनी सांगितले.
अरबी समुद्रात चक्रीवादळ.. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याला सतर्कतेचा इशारा, पावसाची शक्यता
2021 मधील पहिले चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण होणार आहे. अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश्य धोकादायक स्थिती निर्माण झाली असून 16 तारखेला सकाळपर्यंत हे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.