ETV Bharat / city

मुंबईलगत परवडणारी घरे बांधावीत, गृह मंडळाच्या आढावा बैठकीत राधाकृष्ण विखे पाटलांचे म्हाडा अधिकाऱ्यांना निर्देश - मुंबई

मंत्रिपद स्वीकारल्यानंतर विखे पहिल्यांदा म्हाडा मुख्यालयात आले होते. यावेळी त्यांनी म्हाडाने आता मुंबईलगत परवडणारी घरे बांधावीत, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

म्हाडा मुख्यालयात विखेंचे स्वागत करताना म्हाडा अध्यक्ष उदय सामंत,म्हाडा मंडळाचे सभापती मधू चव्हाण, विनोद घोसाळकर, बाळासाहेब पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर
author img

By

Published : Jun 20, 2019, 5:40 AM IST

मुंबई - घरांचे दर सर्वसामान्य मुंबईकरांच्या आवाक्याबाहेरचे आहे. यामुळे म्हाडाने आता मुंबईलगत परवडणारी घरे बांधावीत, असे निर्देश गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. ते मंगळवारी म्हाडा, विविध प्राधिकरण आणि गृह मंडळाच्या आढावा बैठकीत बोलत होते.

मंत्रिपद स्वीकारल्यानंतर विखे पहिल्यांदा म्हाडा मुख्यालयात आले होते. यावेळी त्यांनी महानगर क्षेत्रात बांधण्यात येणाऱ्या घरांच्या किंमती परवडणार्‍या असल्या पाहिजेत. तसेच ग्रामीण क्षेत्रात घरे बांधण्यास प्राधान्य दिले पाहिजे. गिरणी कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध होणार नसतील तर त्यांना मुंबई जवळच नैना प्रकल्पात घेऊन सर्वांना एकाच ठिकाणी घरे द्यावी, अशा सूचना म्हाडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांनी म्हाडा वसाहतीतील अतिक्रमणे आणि संक्रमण शिबिरातील घुसखोरी यापुढे होता कामा नये, असे सांगितले.

बैठकीला म्हाडा अध्यक्ष उदय सामंत,म्हाडा मंडळाचे सभापती मधू चव्हाण, विनोद घोसाळकर, बाळासाहेब पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर उपस्थित होते.

Intro:मुंबई : मुंबईतील घरांचे सध्याचे दर पाहता सर्वसामान्य मुंबईकरांच्या आवाक्याबाहेरचे आहे. यामुळे म्हाडाने आता मुंबईलगत परवडणारी घरे बांधावीत, असे निर्देश गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. मंत्रिपद स्वीकारल्यानंतर ते आज पहिल्यांदा म्हाडा मुख्यालयात आले होते. म्हाडा, विविध प्राधिकरण आणि गृह मंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.Body:मुंबई महानगर क्षेत्रात बांधण्यात येणाऱ्या घरांच्या किंमती परवडणार्‍या असल्या पाहिजेत. तसेच ग्रामीण क्षेत्रात घरे बांधण्यास प्राधान्य दिले पाहिजे. गिरणी कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध होणार नसतील तर त्यांना मुंबई जवळच नैना प्रकल्पात घेऊन सर्वांना एकाच ठिकाणी घरे द्यावी. तसेच म्हाडा वसाहतीतील अतिक्रमणे आणि संक्रमण शिबिरातील घुसखोरी यापुढे होता कामा नये, असेही यावेळी पाटील म्हणाले.

यावेळी म्हाडा अध्यक्ष उदय सामंत,म्हाडा मंडळाचे सभापती मधू चव्हाण,विनोद घोसाळकर, बाळासाहेब पाटील,म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, उपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.