मुंबई - शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांना वह्या आणि पुस्तके वेगवेगळी वागवावी लागतात, यापुढे असे होणार नाही. विद्यार्थ्यांना वह्या विकत घेण्याची गरज नाही, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी (Education Minister Kesarkar said) सांगितले. वह्या आणि पुस्तकांच्या ओझामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे प्रचंड ओझे होते. म्हणून आता सरकारने पुस्तकांमध्येच वही देण्याचा निर्णय घेतला (government decided to provide notebooks in books) आहे.
गृहपाठाला सुट्टी, मुलांनी खेळणे आवश्यक - शालेय विद्यार्थी आता विविध क्लासेस आणि अन्य शैक्षणिक ओझ्याखाली दबलेले आहे. शाळांच्या अवास्तव वेळा आणि अभ्यासाच्या खाली मुलांचे बालपण दबलेले आहे. मुलांना जर स्वच्छंदी आणि स्वतंत्र वातावरणात वाढू दिले नाही, तर त्यांचा व्यक्तिमत्व विकास योग्यरीत्या होत नाही. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आपण विचार करून मुलांचे बालपण जपले पाहिजे, त्यांना मोकळ्या वातावरणात बागडता यायला हवे. यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आपण काही नवे प्रयोग करणार आहोत. मात्र त्यासाठी शिक्षण तज्ञांच्या बैठकीनंतर आणि चर्चेनंतरच त्याला अंतिम रूप देण्यात येईल, असेही केसरकर यांनी स्पष्ट (burden of notebooks on students) केले.
गृहपाठाचे ओझे विद्यार्थ्यांवर नको - मुळात मुलांच्या शाळांच्या वेळा, या त्यांच्या झोपेशी सुसंगत असल्या पाहिजेत. सकाळी सहा वाजता उठून जर मूल शाळेत जात असेल तर ते कसे अभ्यासात लक्ष देणार ? त्यामुळे मुलांच्या शाळेच्या वेळा सुसंगत ठेवून त्यांना अन्य उपक्रमांमध्ये स्वच्छंदपणे आणि स्वतंत्रपणे भाग घेता यावा. मुलांना कविता करणे, लिहिणे, अभिनय करणे, हस्तकला चित्रकला तसेच मैदानी खेळांमध्ये मुलांनी कौशल्य दाखवावे, असे जर आपल्याला वाटत असेल तर मुलांचा गृहपाठ कमी करायला हवा. त्यांना मोकळा श्वास घेता यावा मनाप्रमाणे छंद जोपासता यावेत, यासाठी मुलांना वेळ दिला पाहिजे त्यावर आम्ही काम करीत असून लवकरच त्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल. मात्र गृहपाठाच्या ओझ्यातून मुलांना सुट्टी देऊन त्यांचे व्यक्तिमत्व विकास घडावे, यासाठी आपण प्रयत्नशील (notebooks in books) आहोत. असेही केसरकर यांनी सांगितले.